आपल्या आहारात आले लसूण का आहे उपयुक्त! आलं लसूण खाण्याचे आरोग्यासाठी काय होतात फायदे?
बहुतेक हिंदुस्थानातील घरांमध्ये आलं आणि लसूण हे हमखास वापरले जातात. त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. आलं लसूण आहारात असल्याने, रक्ताभिसरणही वेगाने वाढते. आलं लसूण एकत्र खाल्ल्यामुळे केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. केवळ इतकेच नाही तर, हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.
सर्दी आणि खोकल्याच्या समस्येत आले आणि लसूण यांचे मिश्रण आपल्यासाठी उपयुक्त ठरते. आले आणि लसूण यांचा उष्ण प्रभाव असतो, तो खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते तसेच सर्दी आणि तापापासून खूप आराम मिळतो. आलं लसूण एकत्र खाल्ल्याने घसा खवखवणे कमी होण्यास मदत होते तसेच नाकातून पाणी येणे आणि सर्दी होणे यापासून आराम मिळतो.
आले आणि लसूण एकत्र खाणे आपल्या हृदयासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामुळे वजन सहज कमी होते आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते. यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका कमी होतो. तसेच आपला रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
आले आणि लसूण एकत्र खाल्ल्याने कर्करोगाशी लढण्यास मदत होते. या मिश्रणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे कर्करोगाच्या पेशींना नुकसान पोहोचवून कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
आले आणि लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात; ते खाल्ल्याने हात आणि पाय दुखण्यापासून आराम मिळतो तसेच शरीरातील सूज दूर होते. आले आणि लसूणमध्ये आढळणारे गुणधर्म संधिवाताची लक्षणे कमी करण्यास देखील उपयुक्त ठरतात.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर आले आणि लसूण तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात अँटी-व्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे शरीरात संसर्गाचा धोका कमी करतात. त्यात आढळणारे गुणधर्म रोगप्रतिकारक पेशींचे कार्य वाढवतात, ज्यामुळे फ्लू आणि सर्दी होण्याचा धोका कमी होतो.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List