Satara Crime News – थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर बलात्कार, साताऱ्याच्या दोन तरुणांना अटक

साताऱ्याच्या तरुणांनी थायलंडमध्ये एका जर्मन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघा तरुणांना थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. विजय दादासाहेब घोरफडे आणि राहुल बाळासाहेब भोईटे अशी अटक तरुणांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील रिन बीचवर 14 मार्च रोजी फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत सहभागी झाली होती. रात्रभर ही पार्टी सुरु होती. यादरम्यान पहाटेच्या सुमारास विजय घोरफडे आणि राहुल भोईटे यांनी तरुणीला बीचवरील एका खडकावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघेही बंगल्यावर निघून गेले.
अत्याचार झाल्यानंतर तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी बीचवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 15 मार्च रोजी आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी केली. मात्र आरोपींना पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर 16 मार्च रोजी तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने आरोपींची ओळख पटवली. यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. दोघे आरोपी सध्या थायलंडमधील तुरुंगात आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List