300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर नो कमिशन
ई–कॉमर्स कंपनी ऍमेझॉन इंडियाने छोटय़ा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रोडक्टस्वर व्यापाऱ्यांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही, अशी घोषणा ऍमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. देशात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 1.2 कोटीहून अधिक प्रोडक्टस् आहेत. छोटय़ा व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍमेझॉनने हे पाऊल उचलले आहे.
ऍमेझॉनचा हा निर्णय 125 कॅटेगरीला लागू होईल. यामध्ये बूट, फॅशन ज्वेलरी, ग्रॉसरी, होम डेकोर, ब्यूटी प्रोडक्ट्स, खेळणी, किचनमधील वस्तू, पाळीव प्राण्यांसंबंधी वस्तू यांचा समावेश आहे. ऍमेझॉनने एक किलोपेक्षा कमी वजनाच्या सामानांवरील हँडलिंग शुल्कात 17 रुपयांपर्यंत कपात केली आहे. कमी किमतीच्या कोटय़वधी प्रोडक्टस्वरील रेफरल शुल्क हटवले आणि शिपिंग खर्च कमी केल्याने विक्रेत्यांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. हे नवीन शुल्क 7 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List