लक्षवेधक – व्हिसा शुल्कात वाढ, यूकेचा प्रवास महागणार
येत्या एप्रिलपासून यूकेमध्ये शिकायला जाणे किंवा प्रवास करणे हिंदुस्थानी लोकांसाठी महाग होणार आहे. 19 मार्च 2025 रोजी यूके सरकारने स्टुडंड, व्हिजिटर्स व्हिसा तसेच इलेक्ट्रॉनिक टॅव्हेल ऑथोरायझेशन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली. 9 एप्रिल 2025 पासून नवे व्हिसा शुल्क लागू होतील. यूकेमध्ये प्रवेशासाठी व्हिसाची गरज असते. व्हिसा मिळवण्यासाठी शुल्क भरावे लागते. या शुल्कात आता यूके सरकारने 10 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच व्हिसा शुल्क 149 डॉलरवरून 164 डॉलर एवढे होईल, तर इलेक्ट्रॉनिक टॅव्हेल ऑथोरायझेशन (ईटीए) 12 डॉलरवरून 20 डॉलर एवढे वाढले आहे. ईटीएचे नवे शुल्क येत्या 2 एप्रिलपासून लागू होईल.
आयबीएम कंपनी 9 हजार कामगारांना काढणार
जगभरातील टेक कंपन्यांचा कर्मचारी कपातीचा ट्रेंड अद्याप सुरू आहे. अमेरिकन टेक दिग्गज आयबीएम कंपनी आपल्या 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कंपनी न्यूयॉर्क येथील एक बहुराष्ट्रीय टेक्नोलॉजी कंपनी आहे. तसेच ती 170 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. आयबीएम कंपनी क्लाउड क्लासिक ऑपरेशनमधील मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनी नेमके किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे, याची आकडेवारी अद्याप जारी केली नसली तरी हा आकडा 9 हजारांहून अधिक असणार आहे. आयबीएम कंपनीने काही कर्मचाऱ्यांना आधीच कामावरून काढले आहे.
कर्नाटकच्या राघवेंद्र स्वामी मंदिराला 3.48 कोटींचे दान
कर्नाटकातील राघवेंद्र स्वामी मंदिराला भक्तांनी भरभरून दान दिले आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीची मोजदाद करण्यात आल्यानंतर एकूण 3.48 कोटींची रोख रक्कम, 32 ग्रॅम सोने आणि 1.24 किलो चांदी मिळाली आहे. मंदिराला मिळालेल्या देणगीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राघवेंद्र स्वामी मठ कर्नाटकच्या मंत्रालय मठ मण्ट्रालयम येथे आहे. हे मंदिर म्हणजे भक्तांसाठी जागृत देवस्थान आहे. मंदिराला मिळालेल्या देणगीतील पैशांचा उपयोग समाजसेवेसाठी केला जाणार आहे, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List