ट्रेनमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीपासून बचावासाठी तरुणीची धावत्या गाडीतून उडी

ट्रेनमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीपासून बचावासाठी तरुणीची धावत्या गाडीतून उडी

तेलंगणात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाला. आरोपीपासून बचाव करण्यासाठी अखेर तरुणीने धावत्या गाडीतून उडी घेतली. यात तरुणी जखमी झाली आहे.

पीडित तरुणी मूळची अनंतपूरमधील उरवाकोंडा येथील रहिवासी असून खाजगी क्षेत्रात नोकरी करते. मेडचलमधील एका महिला वसतिगृहात ती राहत होती. मोबाईल फोन दुरुस्त करण्यासाठी तरुणी 22 मार्च रोजी सिकंदराबादला गेली होती. तेथून मेडचलला परतत असताना ही घटना घडली.

तरुणी महिला डब्यातून प्रवास करत होती. तिच्यासोबत अन्य दोन महिला प्रवासी होत्या. मात्र त्या अलवल रेल्वे स्थानकावर उतरल्या. यानंतर तरुणी डब्यात एकटीच होती. यावेळी 25 वर्षाचा एक तरुण महिला डब्यात घुसला आणि त्याने तरुणीकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. तरुणीने त्याला नकार देताच त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी तीने गुंडला पोचमपल्ली रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून उडी घेतली.

रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिलांनी तरुणीला पाहिले आणि त्यांनी आपत्कालीन सेवांना माहिती दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तरुणीच्या डोक्याला, हनुवटीला, उजव्या हाताला आणि कंबरेला जखमा झाल्या आहेत.

याप्रकरणी सिकंदराबादमधील सरकारी रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 75 (महिलेची विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि 131 (गुन्हेगारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे सिकंदराबाद जीआरपीचे निरीक्षक साई ईश्वर गौड यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला...
‘डाळ पुरावी म्हणून जास्त पाणी घालायचो…’ शाहरुख खानने सांगितला तो बालपणीचा संघर्ष
“मला अशी पत्नी नको जी..”; अमिताभ बच्चन यांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट, जया यांच्याकडून खुलासा
मुस्लीम पत्नीसाठी हिंदू अभिनेता करतोय रोजा; इस्लामबद्दल म्हणाला “खूप कठीण..”
Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर
आयाराम गयाराम… कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर ते 10व्या अनुसूचीची थट्टा ठरेल! महाराष्ट्रातील राजकारणावर SC ची महत्त्वाची टिप्पणी
स्तन दाबने बलात्कार नाही, ‘या’ निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींना झापले; म्हणाले अत्यंत असंवेदनशील आणि…