हीरो-हीरोईनमध्ये वेतन मिळण्यात असमानता
बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांना समान वेतन मिळत नाही. अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रीला खूपच कमी वेतन मिळते, हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली शाह हिने व्यक्त केले आहे. ज्या चित्रपटात अभिनेत्री प्रमुख भूमिकेत असेल. तो चित्रपटसुद्धा हिट होत आहे. तरीसुद्धा अभिनेत्रींना पुरेसे वेतन दिले जात नाही. एक वेळ होता ती, ज्या वेळी हिरोची चलती होती, परंतु आता हिरोईनसुद्धा मागे नाहीत. तरीसुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. योग्यतेच्या आधारावर हीरोईनला वेतन मिळायला हवे, असेही शेफाली शाह म्हणाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List