भाजपशासित राज्यांतील आमदारांवर सर्वाधिक खटले; 127 आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे, 1205 जणांवर खुनाचे गुन्हे

भाजपशासित राज्यांतील आमदारांवर सर्वाधिक खटले; 127 आमदारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे, 1205 जणांवर खुनाचे गुन्हे

देशातील भाजपशासित राज्यातील आमदारांवर सर्वाधिक गुह्यांचे खटले आहेत. यातील 45 टक्के आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल असल्याची माहिती स्वयंसेवी संस्था असोसिएशन ऑफ डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालातून समोर आली आहे. एडीआरने 28 राज्ये आणि विधानसभा असलेल्या तीन पेंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 4123 आमदारांपैकी 4092 आमदारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असून यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भाजपशासित राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांत आमदारांवर सर्वाधिक खटले दाखल आहेत.

या अहवालानुसार, उत्तर प्रदेशात 403 पैकी 200 आमदारांवर, महाराष्ट्रात 288 पैकी 187 आमदारांवर, तर बिहारमध्ये 241 पैकी 158 आमदारांवर गुन्हेगारीचे खटले दाखल आहेत. 4 आमदारांवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 अंतर्गत हत्येचे आरोप आहेत, तर 226 जणांवर आयपीसीच्या कलम 307 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 109 अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय 127 आमदारांवर महिलांवरील गुह्यांचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी 13 जणांवर आयपीसीच्या कलम 376 आणि 376 (2)(एन) अंतर्गत बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. कलम 376(2)(एन) एकाच पीडितेवर वारंवार होणाऱ्या लैंगिक हल्ल्यांशी संबंधित आहे. अहवालानुसार, 1861 आमदारांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले दाखल असल्याचे जाहीर केले आहे. यापैकी 1,205 जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील गुन्हे असे गंभीर आरोप आहेत. 24 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे स्पॅनिंग खराब असल्याने विश्लेषण करता आले नाही, तर विधानसभेत सात जागा रिक्त आहेत.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून भाजपला देणगी देणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. एडीआरने दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात भाजपला सर्वाधिक 4340.47 कोटी रुपयांचे देणगी मिळाली आहे. पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा मोठा भाग निवडणूक रोख्यांमधून आला. भाजपने त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 50.96 टक्के म्हणजेच 2211.69 कोटी रुपये खर्च केल्याचेही एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे तब्बल 931 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात गरीब आहेत. अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू यांच्याकडे 332 कोटी रुपयांची संपत्ती, कर्नाटकचे सिद्धारामय्या यांच्याकडे 51 कोटी, मध्य प्रदेशचे मोहन यादव यांच्याकडे 42 कोटी, पुद्दुचेरीचे एन रंगासामी यांच्याकडे 38 कोटी, तेलंगणाचे रेवंत रेड्डी यांच्याकडे 30 कोटी, तर झारखंडचे हेमंत सोरेन यांच्याकडे 25 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन? ‘काही लोकांसाठी औरंगजेब महान झालाय…’, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलच्या ‘छावा’शी कनेक्शन?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हातील खुलताबाद येथे आहे. आता औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, त्याची कबर हटवण्याची मागणी होत आहे. दरम्यान,...
ब्युटी विथ ब्रेन! कोण आहे पंकज त्रिपाठी यांची मुलगी? जी वयाच्या फक्त 18 व्या वर्षी करतेय अभिनयात पदार्पण
अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं चांगले संबंध नव्हते… अनेक वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने सोडलं मौन
होळीत नको तिथे रंग लावल्यामुळे चर्चेत आलेली आमिर अलीची गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या
मुस्लीम असून रमजानमध्ये दारू..; रझा मुराद यांच्या व्हिडीओवर भडकले नेटकरी
हार्दिक पांड्याला नवीन प्रेम सापडल्याने नताशा अस्वस्थ? प्रेम,विश्वासावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत
75 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अजब मागणी, नकार देत म्हणाली, ‘मी पूर्ण थंड पडली कारण…’