‘या’ 4 फळांमध्ये संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी, आहारात समावेश केल्याने अनेक समस्यापासुन मिळेल मुक्तता
व्हिटॅमिन सी हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात, त्वचा निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील अँटिऑक्सिडंट्सची कमतरता पूर्णपणे भरून काढण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी अनेक लोकं त्यांच्या आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करतात. यामध्ये संत्र्याला व्हिटॅमिन सी चा सर्वोत्तम स्रोत मानतात, पण तुम्हाला माहिती आहे का की अशी काही फळे आहेत ज्यामध्ये संत्र्यांपेक्षा जास्त मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. चला जाणून घेऊया त्या 4 फळांबद्दल जे व्हिटॅमिन सीच्या प्रमाणात संत्र्यांनाही मागे टाकतात.
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. एका आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा सुमारे २० पट जास्त व्हिटॅमिन सी असते. अशातच तुम्ही समजा 100 ग्रॅम आवळा घेतला तर यामध्ये सुमारे 600-700 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते, तर संत्र्यात हे प्रमाण फक्त 50-60 मिलीग्राम असते. आवळा केवळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध नसून त्यात अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर पोषक घटक देखील असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. आवळा तुम्ही कच्चा देखील खाऊ शकता. तसेच आवळ्यापासून तुम्ही आवळा रस, चटणी किंवा पावडरच्या स्वरूपात देखील सेवन करू शकता.
किवी
किवी हे एक असे फळ आहे ज्याचे पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे. तसेच किवीमध्ये संत्र्याच्या जवळजवळ दुप्पट व्हिटॅमिन सी असते. समजा 100 ग्रॅम किवीमध्ये सुमारे 90-100 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते. यासोबत किवीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि इतर अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर असतात .
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे फळ प्रत्येकांच्या आवडीचे फळ आहे. स्ट्रॉबेरी केवळ चविष्टच नाहीत तर त्या व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत देखील आहे. 100 ग्रॅम स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 60-70 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे संत्र्यापेक्षा थोडे जास्त प्रमाणात आढळते. त्याचसोबतच स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, फोलेट आणि पोटॅशियम देखील असते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते . स्ट्रॉबेरी ताजी फळे, स्मूदी म्हणून खाऊ शकतात.
पपई
पपई हे एक असे फळ आहे जे केवळ पचनसंस्थेसाठी फायदेशीर नाही तर त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील असते. 100 ग्रॅम पपईमध्ये सुमारे 60-70 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते, जे संत्र्यापेक्षा जास्त आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, फायबर आणि एंजाइम देखील असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List