नॉनवेज खाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय…; रुबिना दिलैकने फराह खानला चिकन सोडण्याचा सल्ला का दिला?

नॉनवेज खाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय…; रुबिना दिलैकने फराह खानला चिकन सोडण्याचा सल्ला का दिला?

दिग्दर्शिका आणि रिअॅलिटी शोची परीक्षक फराह खानने आता सोशल मीडियावर कंटेंट निर्मितीच्या जगात प्रवेश केली आहे. फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींसोबत स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचा विकी आणि अंकिता लोखंडेच्या घरातील किचनमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर फराह अलीकडेच अभिनेत्री रुबीना दिलैकसोबतही एक कुकिंग व्हिडीओ शूट केला आहे. फराह खानच्या नवीन कुकिंग व्लॉगमध्ये हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान हा व्लॉग फराहच्या घरी शूट करण्यात आला आहे. या शूटिंग दरम्यान दोघींमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान, रुबिना फराह खानला चिकन खाणे सोडून देण्याचा सल्ला देते. चिकन सोडल्याने तिच्या तब्येतीत अनेक सकारात्मक बदल दिसून येतील असही रुबिना तिला सांगते.

रुबिना तिचा मांसाहारी खाण्याच्या सवयीबद्दल आणि त्यानंतर झालेल्या तिच्या त्रासाबद्दलही फराहला सांगताना दिसत आहे. रुबिना फराह खानला म्हणते, “अभिनव आणि मी सात वर्षांपासून मांसाहारी, विशेषतः चिकन, खाणे बंद केले आहे. खरंतर, सुरुवातीला जेव्हा आम्ही दोघेही व्यायाम करायचो, तेव्हा आमचे हातपाय सुजायचे आणि आमचे तळवे जास्त दुखायला लागायचे. त्यावेळी आम्हाला खूप अस्वस्थ वाटायचं. मग अभिनव आणि मी चिकन सोडण्याचा निर्णय घेतला आणि चिकन सोडल्यानंतर आम्हाला स्वतःमध्ये चांगले बदल जाणवू लागले”

रुबिनाने पुढे फराह खानला सांगितले की जर तिने मांसाहारी पदार्थ खाणे बंद केले तर तिच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. पण जेव्हा फराह खान, जी नेहमीच नॉनवेजची चाहती राहिली आहे, तिने रुबिनाला विचारलं की तिने चिकन सोडण्यासोबत मासे पण खाऊ नयेत का? तेव्हा रुबिनाने तिला म्हटलं की, मासे खाणे एक वेळ ठीक आहेत, ती मासे खाऊ शकते.

रुबिनाने दिलेल्या सल्ल्याचा विचार करून फराह खान म्हणाली की, ती पुढे जाऊन नक्कीच चिकन सोडण्याचा प्रयत्न करेन तसेच फराहने तिचा स्वयंपाकी दिलीपलाही समजावून सांगितलं की आतापासून त्याने जेवणात कमी चिकन शिजवावं. खरंतर, फराह खानची यखनी पुलाव आणि रोस्ट चिकन हे पदार्थ बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. आता जर फराहने चिकन सोडण्याचा निर्णय घेतला तर ती हे दोन्ही पदार्थ कदाचित बनवणार नाही का? असा प्रश्न पडतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताच देवगिरी बंगल्यावर बैठक, अजितदादा गटाचे बडे नेते पोहोचले; मोठ्या घडामोडींना वेग
मोठी बातमी समोर येत आहे, आज अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे...
फरहानची गोव्यात दंबगगिरी, आता ‘वॉन्टेंड गर्ल’ आयशा टाकियाची वादात उडी, थेट असे केले आरोप
पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू
Champions Trophy 2025- टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; कांगारुंचा 4 गडी राखत पराभव
Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत निकाल लावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा
रिफायनरीच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मिंधे गटात संघर्ष होणार; विषय संपला म्हणणारा मिंधे गट तोंडावर आपटला