खोल खोल पाणी ,विहिरी तळाशी; जिल्ह्यात पाणीबाणी

खोल खोल पाणी ,विहिरी तळाशी; जिल्ह्यात पाणीबाणी

उन्हाचा कडाका सातत्याने वाढू लागल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेलमध्ये खडखडाट झाला आहे. काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने शेतातील उभी पिके, फळबाग जगवायची कशी? असा यक्षप्रश्न काही शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पाण्याची कमतरता असल्याने अंजीर, पेरू, डाळिंबसारख्या फळबागा जगवण्यासाठी मार्च महिन्यातच टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात कमाल तापमान चाळीस अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. तर, दिवसातून पाच ते सहा तास चालणारे बोअर दोन ते तीन तासच सुरू राहत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतकरी फळबागा लावण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे अंजीर, पेरू, डाळिंबाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. मात्र, पाण्याची कमतरता भासत असल्याने फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना टँकरचा आधार घ्यावा लागत असून, त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

शेततळं ठरतंय संजीवनी

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी ही प्रमुख समस्या शेतकऱ्यांपुढे असते. विहिरी आणि बोअरने तळ गाठल्यानंतर पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. या समस्येवर मात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळे घेतले असून, त्यातील पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

विहिरी आणि बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न मार्च महिन्यातच निर्माण झाला आहे. यंदा दसरा, नवरात्राच्या काळात पाहिजे तसा मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे काही भागातील विहिरी, बोअरचे पाणी लवकर कमी झाले आहे. विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी कसे पुरवायचे हा प्रश्न
शेतकऱ्यांपुढे आहे.
– गेनबा शिंदे, शेतकरी, पुरंदर.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा, MMRDA आणि MEIL विरोधातील याचिका फेटाळली ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा, MMRDA आणि MEIL विरोधातील याचिका फेटाळली
    ठाणे ते बोरीवरी दुहेरी बोगद्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीए आणि एमईआयएलविरुद्धची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
बॉलिवूडचे ‘हे’ 5 सेलिब्रिटी ज्यांनी चाळीशीनंतर थाटला संसार, एका अभिनेत्याचं तर तिसरं लग्न
‘ना डान्स येत, ना डायलॉग बोलता येत…’, अभिनेत्रीची ऑडिशन पाहून करण जोहर भडकला, केला सर्वांसमोर अपमान
लाइव्ह शोमध्ये शोएब मलिकला तिसऱ्या पत्नीने म्हटलं ‘बदतमीज’; ट्रोल्स म्हणाले ‘सानिया मिर्झा असती तर..’
या 5 स्टार किड्सचे करिअर सुपर फ्लॉप झालं; प्रेक्षकांनी नाकारले चित्रपट, आता हे कलाकार काय करतायत?
‘संपत्तीमध्ये आणखी किती हिस्से…’, आमिर खानचा नव्या गर्लेफ्रेंडसोबत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
अखेर सलमान – ऐश्वर्याच्या ब्रेकअपमागील खरं कारण आलं समोर; विवेकसोबतचं नातं होतं ‘फेक’?