तू मुस्लिम आहेस, ती नाही…, सना खानने संभावना सेठवर टाकला बुर्खा घालण्यासाठी दबाव, नेटकऱ्यांमध्ये संताप
पूर्व अभिनेत्री सना खान सध्या तुफान चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेटकऱ्यांनी सनावर टीका केली आहे. कारण सना हिने अभिनेत्री संभावना सेठ हिच्यावर रमजानच्या महिन्यात बुर्खा घालण्यासाठी दबाव टाकला. संभावना नुकताच सना खान हिच्या शोमध्ये सामिल झाली होती. याचकारणामुळे सना हिने संभावना हिला बुर्खा घालण्यासाठी सांगितलं. संभावना हिने तिच्या ब्लॉगमध्ये सर्वकाही रेकॉर्ड केलं आहे . अभिनेत्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये संभावना आणि सना यांच्यातील मैत्री दिसून येत आहे. शिवाय सना, संभावना हिला बुर्खा घाल… असं देखील सांगत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र सना खान हिच्यावर निशाणा साधला आहे. व्हिडीओमध्ये संभावनाला सना म्हणते, ‘तुझ्याकडे चांगला ड्रेस नाही का? कानशिलात हवी आहे का? तुझी ओढणी कुठे आहे. बुर्खा घेवून या… संभावनाला बुर्खा घाला…’ सध्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.
यूजर्स या व्हिडिओवर कमेंट करत सना खानवर टीका करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सना खानला प्रत्येकाचा धर्म बदलायचा आहे’, ‘ही लोकं सर्वांना बुर्खा घालायला का लावतात…’, ‘संभावनाने अशी लोकांसोबत राहणं बंद करायला हवं…’, ‘प्रचंड लाजीरवाणी गोष्ट आहे…’
अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘100 चूहे खाकर बिल्ली हज को चली…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘तू मुस्लिम आहेस, ती नाही.’, ‘सनाला तिच्या जुन्या सिनेमांबद्दल सांगा…’ अनेकांनी सनावर निशाणा साधला आहे. तर सनाच्या चाहत्यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर तिची बाजू मांडली आहे. सना आणि संभावना यांच्यामध्ये विनोद सुरु आहेत, त्याकडे जास्त लक्ष देऊ नका… असं सनाचे चाहते म्हणत आहेत.
सना घेतला इंडस्ट्रीचा निरोप
अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर सना खान हिने धर्माचं कारण देत इंडस्ट्रीचा निरोप घेतला आणि मुफ्ती अनस सईद याच्यासोबत लग्न केलं. आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सना कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सना हिने लग्नानंतर दोन मुलांना देखील जन्म दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List