आमचे आभार माना…! स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या मागणीवर अमेरिकेचे फ्रान्सला खरमरीत प्रत्युत्तर
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवरून अमेरिका आणि फ्रान्समध्ये जुंपली आहे. फ्रान्सच्या एका नेत्याने अमेरिकेला भेट दिलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा परत मागितला. त्यानंतर आता अमेरिकेनेही फ्रान्साला खरमरीत उत्तर दिलंय. ‘दुसऱ्या महायुद्धात जर अमेरिकेने फ्रान्सला मदत केली नसती तर फ्रान्स आज जर्मन बोलत असता. फ्रान्सवर जर्मनीने ताबा मिळवला असता. त्यामुळे फ्रान्सने अमेरिकेचे आभार मानले पाहिजेत,’ अशा शब्दात हाईट हाऊसच्या प्रेस सेव्रेट्री पॅरोलिन लेविट यांनी प्रत्युत्तर दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगावर अमेरिकेचे वर्चस्व राखण्यासाठी ट्रम्प हे मोठमोठे निर्णय घेत आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे. अमेरिकेच्या बदलत्या धोरणामुळे युरोपातील अनेक देश त्रस्त झाले आहेत. ट्रम्प यांच्या नव्या धोरणाचा जबर फटका बसत असल्यामुळे फ्रान्सने अमेरिकन प्रशासनाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी परत करा, अशी मागणी नुकतेच केली. त्यावरून उभय देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List