धाकट्याने लाइव्ह गाणं गायलं, मोठ्याने स्टेजवर ड्रम… रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही लेकांनी तर कमालच केली
जिनिलीया व रितेश देशमुखची जोडी ही बॉलिवूडपासून ते अगदी मराठी इंडस्ट्रीपर्यंत खूप लोकप्रिय आहे. सर्वांनाच त्यांच्या नात्याचा हेवा वाटतो. त्यांच्याकडे एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. तसेच दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघेजण जसे कलाकार म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात तशाचपद्धतीने ते पालक म्हणूनही त्यांची जबाबदारी तेवढ्याच काळजीने पार पाडतात. त्यांनी त्यांच्या मुलांवर फार छान संस्कार केले आहेत याचं उदाहरण अनेक व्हिडीओंमधून समोर येतच.
जिनिलीया दोन्ही लेकांच्या शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित राहते
जिनिलीया व रितेश हे जसे रील आणि व्हिडीओ बनवत असतात तसेच ते त्यांच्या मुलांसोबतचेही व्हिडीओ आणि रील्स बनवत असतात. आणि काही वेळेला ते त्यांचे व्हिडीओ शेअरही करत असतात. आताही अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. मुख्य म्हणजे जिनिलीयाने स्वत: हे व्हडीओ तिच्या सोशल माडियावर शेअर केले आहे.
जिनिलीया रियान-राहिलच्या शाळेतील कोणतेही कार्यक्रम असो त्यात नेहमी सहभाग घेताना दिसते. सगळ्या ठिकाणी पुढाकार घेऊन उपस्थित असते. अभिनेत्रीने नुकतीच आपल्या दोन्ही मुलांच्या शाळेत एका कार्यक्रमानिमित्त उपस्थिती लावली होती. यावेळी जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांमधले कलागुण पाहून थक्क झाल्याचं पाहायला मिळालं. याबाबतची पोस्ट शेअर करत तिने दोन्ही लेकांच कौतुक केलं आहे.
दोन्ही लेकांचे शाळेतील कान्सर्टमधील परफॉर्म पाहून जिनिलीया थक्क
जिनिलीयाने हे पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की, “माझ्या मुलांच्या शाळेतील कान्सर्ट दरवर्षीच खूप सुंदर असतात. आज माझ्या लहान मुलांना परफॉर्म करताना पाहून माझं हृदय आनंदाने भरून गेलं आहे. तुमचे आई-बाबा आज तुम्हाला असे चिअर करत आहेत जसं की ते स्वत:च परफॉर्म करत आहेत.”
जिनिलीयाने दोन्ही मुलांचे परफॉर्मन्स पाहून त्यांच्या शिक्षकांचे आभार मानले.
जिनिलीया व रितेश यांच्या 8 वर्षांच्या धाकट्या लेकाने शाळेतील कॉन्सर्टमध्ये लाइव्ह गाणं गायल्याचं पाहायला मिळालं. राहिलचा परफॉर्मन्स सुरू असताना जिनिलीयाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तर, दुसरीकडे अभिनेत्रीचा मोठा लेक रियान चक्क ड्रम वाजवताना दिसला. आपल्या लेकाला ही कला एवढी उत्तम अवगत झाल्याचं पाहून स्वत: अभिनेत्री थक्क झाली होती. जिनिलीयाने दोन्ही मुलांचे परफॉर्मन्स पाहून त्यांच्या शिक्षकांचे आभार मानले. रियान आणि राहिलच्या परफॉर्मन्सची झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.
जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ओळख, मैत्री अन् त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश व जिनिलीया यांनी 2012 मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List