भाऊ कदम यांचं तीन मुलींच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य, ‘मुली सासरी जातत तेव्हा बाप…’
बाप आणि लेकीचं नातं फार वेगळं असते. बापाच्या मनात लेकीसाठी असणारी काजळी, प्रेम, चिंता, जिव्हाळा… फक्त एका लेकीच्या बापाला माहिती असतो. आयुष्यभर लेकीला फुलासारखी ठेवून जेव्हा लग्न होऊन तिच्या पाठवणीची वेळ येते तेव्हा सर्वात जास्त दुःख बापाला होतं. कायम डोळ्यासमोर असणारी लेक आता कित्येक दिवस दिसणार नाही… याच विचाराने बाप अधिक भावुक होतो. जगात लेकीची सर्वांत जास्त काळजी करणारी व्यक्ती म्हणजे बाप… सामान्य बाप असो किंवा सेलिब्रिटी दोघांसाठी लेक सर्वात जास्त महत्त्वाची असते. विनोदवीर भाऊ कदम यांचं देखील असंच काहीसं आहे. तीन मुलींचे वडील असलेल्या भाऊ कदम यांनी मुलींच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मुलींनी कायम माझ्या जवळच राहावं असंच मला वाटतं. त्या कुठे गेल्या नाही पाहिजेत.’ नुकताच झालेल्या एका मुलाखतीत भाऊ कदम यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
भाऊ कदम म्हणाले, ‘एखादा माणूस जेव्हा एका मुलीचा बाप होतो. जेव्हा तिचं लग्न होतं, ती सासरी जातो, तेव्हा त्या बापाच्या भावना काय असतात, हे फक्त एका मुलीच्या बापालाच माहिती आहेत. एक मुलगी असेल तर ठिक आहे. पण माझ्या तर तीन मुली आहे. प्रत्येक वेळी मी किती रडायचं…’
‘माझ्या मुलींनी कधी माझ्यापासून दूर जावं असं मला वाटतंच नाही. त्यांनी कायम माध्या जवळच राहावं असं मला वाटतं. त्या मला सोडून कुठेच नाही गेल्या पाहिजे… त्यांच्या लग्नात माझं काय होईल मला माहिती नाही. मी त्यांच्या लग्नाच जाणार नाही. मी शुटिंग किंवा नाटकात स्वतःला व्यस्त करुन ठेवेल.’
‘मुली सासरी गेल्यानंतर कधी त्यांच्या सासरी जाईल त्यांना भेटून येईल. त्यांच्याबद्दल माझ्या डोक्यात अनेक विचार येतात, म्हणून मी कधी विचारच करत नही. त्यांच्या विचारानेच मी ‘दाटून येतो कंठ’ हे गाणं गाऊच शकत नाही. एकदा मी ते गाणं गात होतो.’
‘गात असताना मी स्वतःला थांबवलं आणि गाण्यातील प्रत्येक शब्द मला जाणवू लागला… त्यामुळे मी कधी माझ्या मुलींच्या लग्नाचा विचारच करु शकत नाही…’ मुलींच्या लग्नाबद्दल बोलताना भाऊ कदम भावूक देखील झाले. संचिता, समृद्धी आण मृण्मयी अशी भाऊ कदम यांच्या मुलींची नावे आहेत.
भाऊ कदम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या विनोदबुद्धीने भाऊ कदम यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भाऊ कदम यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List