Hybrid इंजिन, ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा फीचर्स; Volvo XC90 लॉन्च, जाणून घ्या किंमत
व्होल्वोने हिंदुस्थानी बाजारात आपली Volvo XC90 Facelift कार लॉन्च केली आहे. ही लक्झरी कार 1.03 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे, जी सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 लाख रुपये जास्त आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…
नवीन व्होल्वो XC90 SUV च्या बाह्य डिझाइनमध्ये बदल दिसून येत आहेत. यात क्रोम-लोडेड ग्रिल आणि मॅट्रिक्स-डिझाइन एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहे. मागील बाजूस, टेल लॅम्प देखील बदलण्यात आले आहेत. पुढील आणि मागील बंपर देखील नवीन आहेत. Volvo XC90 Facelift मध्ये ड्युअल-टोन 21-इंच अलॉय व्हील्स, डोअरवर सिल्व्हर क्लॅडिंग आणि विंडोंवर क्रोम बेझल्स देखील आहेत.
फीचर्स
यात नवीन आणि मोठी 11.2-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, रिफ्रेश केलेले डॅशबोर्ड डिझाइन, पॉवर-अॅडजस्टेबल सीट्स, कलर हेड-अप डिस्प्ले, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, बॉवर्स अँड विल्किन्स आणि नवीन वायरलेस चार्जिंग पोर्ट सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी यात 360-डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सेफ्टी यासह अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, XC90 मध्ये 48V माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानासह 2.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 253 बीएचपी आणि 360 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या एसयूव्हीची टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे आणि ही कार 7.7 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List