बदलत्या हवामानात लहान मुलांना ‘हे’ पदार्थ खायला देऊ नका, तज्ज्ञांकडून जाणून घ्या
बदलत्या हवामानात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण ऋतूमध्ये बदल होत असताना, आजारांचा धोका वाढतो, विशेषतः लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक वाढते. कारण मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम मुलांवर झपाट्याने होतो. हवामान बदलताच मुले आजारी पडू लागतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेण्यापासुन ते त्यांच्यासाठी हानिकारक असू शकणाऱ्या काही गोष्टी टाळणे महत्वाचे आहे. तर यावेळी आरोग्य तज्ञ याबद्दल काय म्हणतात आणि मुलाची काळजी कशी घ्यावी ते जाणुन घेऊयात…
जंक फूड टाळा
बदलत्या हवामानात मुलांना ताजे आणि हलके अन्न द्यावे. अशातच तुम्ही मुलांना रात्रीचे अन्न खायला दिल्यास त्यातील बॅक्टेरिया वाढण्यास कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि चिप्स यांसारखे जंक फूड मुलांच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम करू शकतात.
थंड पदार्थ टाळा.
ऋतू बदलला की घसा खवखवणे आणि सर्दी यासारख्या समस्या होणे आता सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत मुलांना फ्रिजमध्ये ठेवलेले आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि थंड पाणी देऊ नये. यामुळे घशाचे इंनफेक्शन होऊ शकते आणि आजारांचा धोका वाढू शकतो.
जास्त गोड पदार्थ देऊ नका.
मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात, पण टॉफी, चॉकलेट, केक आणि गोड पदार्थ यांसारखे जास्त साखरेचे पदार्थ त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. यामुळे सर्दी आणि अॅलर्जीचा धोका वाढू शकतो.
कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न देऊ नका.
बदलत्या हवामानात कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अन्न जसे की सॅलड, कापलेली फळे किंवा अर्धवट शिजवलेल्या भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्ग होण्याचा धोका असतो. मुलांना फक्त ताजे आणि चांगले शिजवलेले अन्न देण्याचे नेहमी लक्षात ठेवा.
जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळा
मुलांना जास्त मसालेदार किंवा तळलेले अन्न देऊ नये. अशा पदार्थांमुळे लहान मुलांच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे गॅस आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त दुग्धजन्य पदार्थ देऊ नका
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पोषणासाठी चांगले असतात, परंतु हवामान बदला दरम्यान त्यांचे जास्त सेवन केल्याने श्लेष्मा वाढू शकतो आणि त्याने घसा खवखवू शकतो. म्हणूनच मुलांना मर्यादित प्रमाणात दूध, चीज आणि दही द्यावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List