जर तुमचंही शरीर देत असेल ‘हे’ पाच संकेत; तर समजू जा किडनी खराब झालीये
बदललेली जीवनशैली, खानापिण्याच्या चुकीच्या सवई आणि टेन्शन यामुळे आज अनेक जण विविध आरोग्याच्या समस्येंचा सामना करत आहेत. अनेकांना बीपी आणि डायबिटीजचा आजार असतो, सध्या आणखी एक आजार वेगानं वाढतो आहे तो म्हणजे किडनीशी संबंधित समस्या. तुमच्या किडनीमध्ये जर काही समस्या असेल तर ती लवकर तुमच्या लक्षात येत नाही, मात्र त्यानंतर ती गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे किडनीच्या आजारांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल तर तुमच्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी तीव्र वेदना होतात. तुम्ही जर अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला योग्य उपचाराचा सल्ला दिला जातो. मात्र त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण औषधोपचार केला तर गंभीर स्वरुपाचा आजार टाळता येऊ शकतो.
किडनी हा तुमच्या शरिराचा सर्वात महत्त्वाचा अवयव असतो, ज्याच्यामाध्यमातून शरीरातील घाण बाहेर टाकण्याचं आणि रक्त शुद्ध करण्याचं काम केलं जातं. मात्र जर तुमच्या किडनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्या शरीराच्या विशिष्ठ भागांमध्ये तीव्र वेदना होतात, त्यामुळे त्यासंदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. जर तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असेल तर सर्वात आधीच तुमची किडनी चांगली असणं गरजेचं आहे. जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल तर तुमचं शरीर त्याबद्दल काही संकेत देतं, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कमरेच्या आसपास वेदना – जर तुमच्या किडनीवर सूज आली आहे, तर अशा स्थितीमध्ये तुमच्या कमरेच्या जवळ वेदना होतात. जर तुमची किडनी जास्तच खराब असेल तर तुम्हाला शरीराच्या इतरही भागात वेदना होऊ शकतात.
पोटात दुखणं – जर तुमच्या किडनीमध्ये काही समस्या असेल तर तुमच्या पोटामध्ये तीव्र वेदना होतात. जर तुमचं पोट खूप जास्त दुखत असेल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, ते तुमच्या किडनी फेल्यूअरचं देखील लक्षण असू शकतं.
जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका, यामुळे तुम्हाला भविष्यात किडनीसंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीरातील खालच्या भागांमध्ये वेदना – हे देखील किडनीमध्ये काही तरी समस्या निर्माण झाल्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे अशा स्थितीमध्ये वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कधीकधी वरील सर्व लक्षण एकाच व्यक्तीमध्ये दिसून येतात. अशा स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप वरील माहिती ही उपलब्ध माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे, या माहितीची टीव्ही 9 कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही. तुम्हाला काही समस्या जाणवल्यास सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List