रेखासोबत रोमान्स करणार होता ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता, पण…

रेखासोबत रोमान्स करणार होता ‘हा’ पाकिस्तानी अभिनेता, पण…

Rekha Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एका काळ असा होता जेव्हा फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील रेखा यांच्या सौंदर्यावर आणि घायाळ अदांवर फिदा होते. अनेकांनी मोठ्या पडद्यावर रेखा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा व्यक्त केली. पण अनेक अभिनेत्याची ही इच्छा फक्त इच्छाच राहिली. असंच काही पाकिस्तानी अभिनेता जावेद शेख याच्यासोबत झालं आहे. जावेद शेख एका पाकिस्तानी अभिनेते आहेत.

जावेद यांनी अनेक पाकिस्तानी मालिका आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. जावेद शेख यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘ओम शांती ओम’ सिनेमात देखील काम केलं आहे.

‘ओम शांती ओम’ सिनेमासोबतच जावेद शेख यांनी ‘मनी है तो हनी है’, ‘नमस्ते लंडन’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. दरम्यान, एका मुलाखतीत जावेद यांनी मोठा खुलासा केला होता. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ‘खून भारी मांग’ सिनेमासाठी जावेद शेख यांना विचारलं होतं.

पण जावेद शेख ‘खून भरी मांग’ सिनेमात रेखा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करता आली नाही. जावेद शेख यांनी पूर्व पत्नी सलमा आगा यांच्यामुळे सिनेमात काम करण्यास नकार दिला. जेव्हा सलमा यांना कळलं की पती जावेद यांना रेखा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळत आहे. तेव्हा सलमा यांच्या वागणुकीत बदल झाला… असं जावेद यांनी मुलाखतीत सांगितलं.

‘पत्नीच्या बदलेल्या वागणुकीमुळे मी सिनेमासाठी नकार दिला…’ असं देखील जावेद मुलाखतीत म्हणाले. सांगायचं झालं तर, सिनेमात जावेद शेख यांच्या जागी अखेर अभिनेते कबीर बेदी यांची वर्णी लागली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील तुफान कामगिरी केली.

रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नपर्यंत पोहोचलं नाही. अखेर त्यांनी एका उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 6 महिन्यात रेखा यांच्या पतीने स्वतःला संपवलं. आज वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागणार? मोठी अपडेट समोर
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यंटन स्थळावर पर्यटकांसाठी बंद, पर्यटनास जाण्यापूर्वी जाणून घ्या परिस्थिती
नवी मुंबई विमानतळामुळे प्रकल्पग्रस्तांना रोजगाराचे नवे दालन खुले, काय आहे योजना ?
सिडकोची मनमानी, नगरविकास मंत्र्यांचा आदेशही जुमानत नाही; अंबादास दानवेंनी उपस्थित केला खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीचा मुद्दा
सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची त्यावर राजकारणाची पोळी भाजायची हे घृणास्पद आहे, उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले
खळबळजनक! मोमोज बनवणाऱ्या कारखान्यावर वैद्यकीय पथकाचा छापा, फ्रीजमध्ये आढळले कुत्र्याचे डोके
Palm Rubbing- दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर घासल्याने, आरोग्यासाठी मिळतील खूप सारे फायदे