‘त्याला मिशी-दाढी अन् तो चहा पिणारा…’; प्राजक्ता माळीचा होणारा नवरा असा असणार
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या फुलवंतीनंतर ‘चिकी चिकी बुबूम बुम’चित्रपटांमुळे चर्चेत आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून यामध्ये प्राजक्तासह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात असे बरेच तगडे कलाकार मंडळी झळकले आहेत. दरम्यान प्राजक्ता गेल्या काही दिनसांपासून अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने तिच्या लग्नाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे.
प्राजक्ताला तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा हवा ?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीने लग्नाला तयार असल्याचं सांगत आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर तिला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून लग्नाची मागणी घातली होती. यामधील एक पत्र प्राजक्ताला खूप आवडलं होतं. त्यानंतर आता ‘झी चित्र गौरव पुरस्कार 2025’ मध्ये अगदी सर्वांसमोर प्राजक्ताने तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा हवा आहे? याबाबत सांगितलं आहे.
दाडी- मिशी अन् चहा पिणारा
‘झी चित्र गौरव पुरस्कार 2025’ सोहळ्याला प्राजक्ता माळीने खास उपस्थिती लावली होती. या सोहळ्यात तिला अमेय वाघने स्वप्नातल्या हिरोबाबत विचारलं. अमेय तिला म्हणाला की, “प्राजक्ता तुझ्या स्वप्नातला हिरो कसा आहे? काय वाटतं? चहा पिणारा की कॉफी पिणारा?” यावर प्राजक्ता म्हणाली “चहा पिणारा.” यावर अमेयने विचारलं, “का?” तर प्राजक्ता म्हणाली, “मला चहा छान बनवता येतो आणि मला प्यायलाही आवडतो. तर घरात तेच बनेल.” त्यानंतर अमेयने विचारलं, “दाढी की क्लिन शेव?हवी” तेव्हा प्राजक्ताने म्हटलं दाढी असलेला.” यावरही अमेयने पुन्हा “का?” असा प्रश्न विचारला त्यावर प्राजक्ता म्हणाली, ” दाडी- मिशी छान दिसते. मराठी माणसाला मिशी आणि दाढी पाहिजेच”
“डोंगरावर प्रेम फुलेलं”
पुढे अमेयने विचारलं, “समुद्र किनाऱ्यावर फिरायला घेऊन जाणारा की डोंगरावर फिरायला घेऊन जाणारा?” प्राजक्ता माळी म्हणाली की, डोंगरावर. अमेयने विचारलं, “समुद्र किनाऱ्यावर का नाही?” तर प्राजक्ता म्हणाली की, “डोंगरावर प्रेम फुलेलं. समुद्र किनारी जरा उथळ फ्लटिंग होईल.” हे ऐकताच अमेय वाघ म्हणतो, “म्हणजे जे कोकणात, गोव्यात राहतात ते उथळ फ्लटिंग करतात?” यावर प्राजक्ता म्हणाली, “नाही. त्याने मला डोंगरावर फिरायला घेवून जाव”
फुलवंतीला तब्बल सहा पुरस्कार
शेवटी अमेयने विचारलं, “तुझ्यावर कविता करणार की तुझ्या कविता ऐकणारा?” प्राजक्ता म्हणाली की, “कविता ऐकणारा” मग अमेय म्हणतो, “मग मला असं वाटतं, जो कोण आहे. ज्याने तुझ्या कविता ऐकल्या पाहिजे, त्याच्यासाठी एक कविता होऊन जाऊ दे.” असं म्हणत अमेयनं प्राजक्ताला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी कविताही बोलायला सांगितली. त्यानंतर प्राजक्ताने ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही कविता ऐकवली. दरम्यान,’झी चित्र गौरव पुरस्कार 2025′ मध्ये प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ चित्रपटाला एक-दोन नव्हे तर तब्बल सहा पुरस्कार मिळाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List