मोठी बातमी! अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम; दोन बडे नेते गळाला, मोठा धक्का
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं तब्बल 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे, महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे दोन बडे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 23 मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.
दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश होणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आता हा आणखी एक मोठा झटका काँग्रेसला बसणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List