निजामुद्दीन गोवा एक्प्रेसला आता जेजुरीत थांबा
पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरून धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस ही अति जलद रेल्वे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात अल्पवेळ थांबणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे विभाग व्यवस्थापक धर्मवीर मीना, पुणे विभाग व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मा यांनी दिली. श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाच्या देवदर्शनासाठी राज्यातील भाविकांबरोबरच इतर राज्यांतून अनेक भाविक येतात. परंतु रेल्वे स्थानकावर सर्व गाडय़ा थांबत नसल्याने भाविकांची गैरसोय होते. रेल्वे स्टेशन परिसरातील स्थानिक कार्यकर्त्या माजी नगरसेविका आमीना पानसरे, रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय खोमणे, गणेश आबनावे व ग्रामस्थांनी निजामुद्दीन एक्सप्रेसला जेजुरीत थांबा मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली आहे. जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहेच, परंतु या ठिकाणी औद्योगिक वसाहत असल्याने ही गाडी थांबण्याचा उद्योजकांनाही फायदा होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List