कर्मचाऱ्यांना माणसांसारखे वागवा – नारायण मूर्ती
उद्योजकांनी कर्मचाऱ्यांना माणसारखे वागवावे, असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. उद्योजकांनी कंपन्यांमधील सर्वात कमी आणि सर्वाधिक पगारातील फरकदेखील कमी केला पाहिजे, असेही नारायण मूर्ती यावेळी म्हणाले. प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचाऱ्याचा आदर आणि प्रतिष्ठा राखली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे जाहीरपणे कौतुक केले पाहिजे आणि खासगीत टीका केली पाहिजे. कंपनीचे सर्व फायदे तिच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये न्याय्य पद्धतीने वाटले पाहिजेत, असेही मूर्ती यावेळी म्हणाले. देश सध्याच्या समाजवादी मानसिकतेसह यशस्वी होऊ शकत नाही. भांडवलशाही लोकांना नवीन कल्पना घेऊन येण्याची संधी देते. जेणेकरून ते स्वतःसाठी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमवू शकतील, नोकऱ्या निर्माण करू शकतील आणि अशा प्रकारे गरिबी कमी करू शकतील, असे ते म्हणाले. दरम्यान, याआधी मूर्ती म्हणाले होते की, कर्मचाऱ्यांनी किमान 70 तास काम करायला हवे, यावरून वाद निर्माण झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List