देहूनगरीत उद्या रंगणार बीज सोहळा
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा बिजोत्सव त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव वर्षपूर्ती सोहळ्याची सांगता आणि 376 वा बीज सोहळा हरिनाम गजरात येत्या रविवारी देहूत साजरा होत आहे. या निमित्त राज्य परिसरातून वारकरी, भाविक, फडकरी आणि संपूर्ण राज्य परिसरात ठीक ठिकाणी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील मान्यवर या सोहळ्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवार बीज सोहळ्यादिनी श्री क्षेत्र देहूत विविध धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार आहेत. यामध्ये पहाटे तीन वाजता काकडा, पहाटे चार वाजता देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते श्रींची पूजा, शिळा मंदिर महापूजा वंशज देहू/वारकरी यांच्या हस्ते होईल. पहाटे सहा वाजता वैकुंठ गमन स्थान येथे पूजा, सकाळी साडेदहा वाजता श्रींची पालखी वैकुंठ गमन स्थान कडे हरिनाम गजरात मार्गस्थ होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List