‘जाण्याची वेळ आलीये याचा अर्थ…’, अमिताभ बच्चन यांनी का लिहिलेली ‘ती’ क्रिप्टिक पोस्ट?
Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये बिग बी यांनी ‘जाण्याची वेळ आलीये…’ असं लिहिलं होतं. बिग बींनी मध्यरात्री लिहिलेलं ते ट्विट सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला. ज्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावर अखेर बिग बी यांनी मौन सोडलं आहे. बिग बी यांनी त्या ट्विटवर अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘कोन बनेगा करोडपती 16’ शोचा एक प्रोमो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये बिग बींना ट्विटचा खुलासा केला आहे. शोमध्ये एका चाहत्याने बिग बींना विचारलं, ‘जाण्याची वेळ आली आहे…’ असं ट्विट का केलं होतं.
यावर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘त्यामध्ये एक ओळ होती, जाण्याची वेळ आलीये…. तर यामध्ये काही गडबड आहे का? जाण्याची वेळ आलीये याचा अर्थ कामासाठी जाण्याची वेळ आली आहे. रात्री 2 वाजता येथून (केबीसी) जातो. म्हणून घरी पोहोचण्यासाठी देखील उशीर होतो.’
‘लिहिता लिहिता मला झोप आली… जाण्याची वेळ आणि आम्ही झोपलो…’, सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन कायम सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत असतात. बिग बीच्या चाहत्यांची संख्या भारतातचं नाही तर, परदेशात देखील फार मोठी आहे. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. त्यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात. पण आता बिग बी यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे
बिग बींच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती 16’ शो होस्ट करत आहे. सध्या त्यांनी कोणत्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. पण बिग बी ‘रामायण’ सिनेमात झळकतील असं सांगण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List