फिट राहण्याचा नवा मंत्र, फॉर्म्युला 5:2, जाणून घ्या आहाराचे फायदे अन् नियम
आजकाल प्रत्येकजण या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य हेल्दी कसे राहील याकडे लक्ष देत आहेत. अशातच अनेकजण हेल्दी राहण्यासाठी घरगुती उपाय करत आहेत. त्याचबरोबर आता फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढतच चालेली आहे. वजन कमी करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, लोकं अनेक प्रकारे आहारात पौष्टिक व प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करत असतात. तसेच अनेकजण आहारात देखील डाएट प्लॅन करत असतात. त्यापैकी आता इंटरमिटंट फास्टिंग (Intermittent Fasting) हा डाएट खूप लोकप्रिय झाला आहे. याचा एक खास प्रकार म्हणजे 5:2 डाएट, जे सेलिब्रिटी तसेच सामान्य लोकांकडून सर्वाधिकरित्या पाळला जात आहे.
5:2 डाएट केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर चयापचय सुधारण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त मानला जातो. आज या लेखात आम्ही तुम्हाला 5:2 डाएट म्हणजे काय, हा डाएट प्लॅन कसा कार्य करतो आणि त्याचे पालन करण्याचे फायदे काय आहेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…
5:2 डाएट म्हणजे काय?
5:2 डाएट म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग करण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये आठवड्यातून 5 दिवस सामान्य आहार घेतला जातो आणि कॅलरीजचे सेवन 2 दिवसांसाठी मर्यादित केले जाते. तुम्ही 5 दिवस सामान्य प्रमाणात हेल्दी अन्नाचे सेवन करू शकता. 2 दिवसांसाठी कॅलरीजचे सेवन 500-600 कॅलरीजपर्यंत मर्यादित प्रमाणात केले जाते. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला 2 दिवस पूर्णपणे उपाशी राहावे लागेल, तर तुम्हाला कमी कॅलरी असलेले हेल्दी पदार्थ खावे लागतील.
5:2 डाएट कसा काम करतो?
जेव्हा आपण अन्नपदार्थांचे सेवन करताना कमी कॅलरीज असलेले अन्नाचे सेवन करातो तेव्हा आपले शरीर साठवलेल्या फॅटचा ऊर्जेसाठी वापर करत असते, कारण याने तुमचे फॅट बर्न होते व त्याने वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय,5:2 च्या डाएटमुळे इन्सुलिनची पातळी कमी होते आणि शरीरात असलेले फॅट लवकर बर्न होते.
5:2 डाएट कसा पाळायचा?
5 दिवस सामान्य आहार: तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येनुसार निरोगी अन्न खावे लागेल, परंतु जास्त खाणे टाळणे महत्वाचे आहे.
2 दिवस (उपवासाचे दिवस): उर्वरित 2 दिवसात, पुरुषांना 600 कॅलरीज पर्यंत आणि महिलांना 500 कॅलरीज असलेने पदार्थांचे सेवन करावे लागतील.
5:2 डाएटचे फायदे
वजन कमी करण्यास मदत करते –
5:2 च्या डाएटमुळे कॅलरीजचे सेवन मर्यादित होते, ज्यामुळे शरीरात साठलेली अतिरिक्त फॅट कमी होण्यास मदत होते. हे चयापचय गतिमान करते आणि फॅट लवकर बर्न होण्याची प्रक्रिया वाढवते.
रक्तातील साखर नियंत्रणात फायदेशीर –
हा आहार इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतो आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर ठरू शकते, परंतु असा डाएट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.
हृदय निरोगी ठेवते –
5:2 डाएटचे पालन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
मेंदूसाठी फायदेशीर –
अधूनमधून उपवास केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. हे अल्झायमर आणि न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करू शकते.
कोणते पदार्थ खाऊ शकतात?
उच्च फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन करा. जसे की ब्रोकोली, पालक, गाजर त्याच बरोबर सफरचंद, बेरी, डाळिंब असे फळ आहार घ्या. अशातच तुमच्या या डाएटमध्ये काजू आणि अक्रोड, बदाम, चिया बियाणे यांचाही समावेश करा. हेल्दी फॅट असलेले अॅव्होकॅडो, ऑलिव्ह ऑइल अंडी, चिकन, डाळीचे प्रकार देखील तुम्ही समावेश करू शकता.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List