Photos: प्राजक्ता माळीचा कर्जतमधील फार्महाऊस पाहिलात का? पाहा एक झलक
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी चित्रपटांमुळे. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. गेल्या वर्षी प्राजक्ताने कर्जत येथे एक फार्महाऊस घेतला. या फार्म हाऊसची झलक तुम्ही पाहिली आहे का? नाही ना मग चला पाहूया...
प्राजक्ताने गेल्या वर्षी साधारण जुलै महिन्यात कर्जत येथे फार्महाऊस घेतला. या फार्महाऊसला तिने 'प्राजक्तकुंज' असे नाव दिले.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभा केलेला हा फार्महाऊन प्राजक्ताने भाड्याने देण्यास सुरुवात केली आहे. काढलेलं कर्ज फेडण्यासाठी तिने हे फार्महाऊस भाडेतत्त्वावर देण्याचं ठरवलं. हास्यजत्रेच्या कलाकारांनीही प्राजक्ताच्या फार्म हाऊसवर हजेरी लावली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List