‘लाज वाटली पाहिजे…’, राहुल गांधींविरुद्ध प्रिती झिंटा मानहानीचा खटला दाखल करणार? काय आहे प्रकरण?
Preity Zinta – Rahul Gandhi: अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने दावा केला होती की, भाजपने प्रितीच्या डोक्यावर असलेलं 18 कोटींचं कर्ज माफ करण्यास मदत केली आहे. केरळच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर अभिनेत्रीविरोधात दावा करण्यात आला आहे. शिवाय भाजपकडून प्रितीचं सोशल मीडिया अकाउंट हाताळलं जातं असा देखील दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अभिनेत्री सर्व दावे फेटाळले आहेत. त्यानंतर अभिनेत्रीला ‘राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार? असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे.
यावर अभिनोत्री सडेतोड उत्तर दिलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘कोणाला अशा प्रकारे बदनाम करणं मला योग्य वाटत नाही. कारण ते (राहुल गांधी) कोणत्याही कारणासाठी जबाबदार नाही. कोणत्याही अडचणीवर मला थेट मात करायला आवडतं. छोट्या भांडणातून नाही. मला राहुल गांधींशीही काही अडचण नाही, म्हणून त्यांना शांततेत जगू द्या आणि मीही शांततेत जगेन.’
Today feels like a perfect day for an impromptu #Pzchat ! Any recommendations for a chat or should we keep it generic ? Let me know folks as I have an hour to chat
— Preity G Zinta (@realpreityzinta) February 27, 2025
पोस्टमध्ये पुढे दावा करण्यात आला आहे की, बँक दिवाळखोर झाली आहे, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यावर स्पष्टीकरण देत प्रिती म्हणाली, ‘चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी पक्षावर निशाणा साधण्यात येत आहे. मी माझं सोशल मीडिया अकाउंट स्वतः पाहते. खोट्या बातम्या पसरवताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे… ‘
‘मला मोठा धक्का बसला आहे. कारण एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी माझं नाव आणि फोटो वापरून खोट्या बातम्या पसरवत आहेत आणि ओंगळ विधाने करत आहेत आणि आमिष दाखवत आहेत.’ सध्या प्रितीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रिती झिंटा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘लाहोर 1947’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा आमिर खान प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत असलेल्या ऐतिहासिक कथेवर आधारित आहे. सिनेमात अभिनेता सनी देओल आणि त्यांचा मुलगा करण देओल देखील दिसणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List