मल्हार सर्टिफिकेशनला खंडोबा देवस्थानचा पाठिंबा, ग्रामस्थ मंडळाचा मात्र विरोध

मल्हार सर्टिफिकेशनला खंडोबा देवस्थानचा पाठिंबा, ग्रामस्थ मंडळाचा मात्र विरोध

हिंदू समाजातील मटणाच्या दुकानांना ‘मल्हार सर्टिफिकेशन’ हे नाव देण्यास जेजुरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. जेजुरीचा श्री खंडोबा शाकाहारी दैवत असल्याने त्याला मांसाहाराचा नैवेद्य चालत नाही. त्यामुळे आमच्या देवाचे नाव मटणाच्या सर्टिफिकेशनला देऊ नये. ही सर्टिफिकेशन योजना जबरदस्तीने सरकारने लादल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

‘हिंदू समाजातील मटणाच्या दुकानांना ‘मल्हार सर्टिफिकेशन’ देण्याची योजना सुरू करू,’ असे वक्तव्य मत्स्य व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी केले होते. यावर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. श्री खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या निर्णयाचे बहुमताने स्वागत केले असले, तरी एक विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून मटण दुकानांना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर ‘मल्हार’ नाव देण्यास तीव्र विरोध केला आहे. या बैठकीला मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, अॅड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, पोपट खोमणे हे उपस्थित होते.

श्री खंडोबा शाकाहारी दैवत; मांसाहारी नैवेद्य चालत नाही

यासंदर्भात ग्रामस्थ मंडळाची बैठक झाली. यावेळी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ला तीव्र विरोध करण्यात आला. ‘महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरीचा श्री खंडोबा शाकाहारी दैवत असल्याने त्याला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. मांसाहारी नैवेद्य देवाची धाकटी बायको बानू देवी हिला दाखविला जातो; पण तो गडावर घेऊन जात नाहीत. त्यामुळे या सर्टिफिकेशन योजनेस ‘मल्हार’ नाव न देता इतर नाव द्यावे. कोणत्याही देवाचे नाव देण्यास आमचा विरोध आहे,’ असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी स्पष्ट केले. जबरदस्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. समस्त ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीला खंडोबा देवस्थानचे माजी विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप जगताप, शिवराज झगडे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, सचिव छबन कुदळे, तुषार कुंभार, किसन कुदळे, नीलेश हरपळे, मनोज शिंदे, संतोष खोमणे-पाटील, पुजारी गणेश आगलावे आदी उपस्थित होते. याबाबत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री नीतेश राणे, आमदार विजय शिवतारे यांना निवेदन देणार आहे.

श्री कडेपठार खंडोबा देवता ट्रस्टचाही विरोध

श्री खंडोबाचे मूळ ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडेपठारच्या डोंगरातील श्री खंडोबा देवस्थानचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत ‘मल्हार झटका सर्टिफिकेशन’ देण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात आला. यावेळी सर्व सात विश्वस्त उपस्थित होते. ‘श्री मल्हारी मार्तंड हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. योजनेला दुसरे कोणतेही नाव द्यावे; परंतु ‘मल्हार’ नाव देऊ नये,’ अशी मागणी प्रमुख विश्वस्त वाल्मिकी रंगनाथ लांघी यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी सूचक विधान अन् आता…; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक विधान अन् आता…; जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाथ्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र जयंत पाटील...
मराठी कलाकारांची मुंबई लोकलमध्ये अनोखी रंगपंचमी; पहा व्हिडीओ
आमिर खानने नव्या गर्लफ्रेंडच्या सुरक्षेसाठी घेतला मोठा निर्णय, म्हणाला, ‘लपवायचं नाही, पण काही मर्यादा…’
Shamita Shetty : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यामुळे शिल्पा शेट्टीची बहिणी वयाच्या 46 व्या वर्षीही एकटीच, तो मात्र…
फिट राहण्याचा नवा मंत्र, फॉर्म्युला 5:2, जाणून घ्या आहाराचे फायदे अन् नियम
उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य हेल्दी राहण्यासाठी असा घ्या आहार, तज्ञांकडुन जाणून घ्या
Benefits Of Chutney- पानात डाव्या बाजूला चटणी का असायला हवी? सविस्तर वाचा आरोग्याच्या दृष्टीने चटणीचे काय महत्त्व आहे