युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाचं कारण अखेर समोर, 4 शब्दात धनश्रीने सर्वकाही सांगितलं
Dhanashree Verma – Yuzvendra Chahal Divorce: गेल्या काही दिवसांपासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडीयाच्या माध्ममातून धनश्री कायम मनातील भावना व्यक्त करत असते. आता देखील असंच काही झालं आहे. घटस्फोटानंतर, 9 मार्च रोजी दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चहलला आरजे मैहवश सोबत स्पॉट करण्यात आलं. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच, काही तासांनंतर धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि 4 शब्दात सर्वकाही सांगितलं.
धनश्रीची पोस्ट पाहिल्यानंतर कळत आहे की, ती अद्याप घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. युजवेंद्रला दुसऱ्या मुलीसोबत पाहताच धनश्री म्हणाली, ‘कायम महिलांना ब्लेम करण एक फॅशन झाली आहे…’, अशात धनश्री इन्स्टाग्राम स्टोरीवरून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, चूक तिची नसून युजवेंद्र याची आहे. घटस्फोटासाठी धनश्री हिने युजवेंद्र याला जबाबदार ठरवलं आहे.
सांगायचं झालं तर, जेव्हा धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला तेव्हा धनश्री प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी तर धनश्री हिलाच घटस्फोटासाठी जबाबदार ठरवलं होतं. पण तेव्हा धनश्री एका शब्दाने काही बोलली नाही. ती कायम सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त करायची. पण युजवेंद्रचा दुसऱ्या महिलेसोबत फोटो पोस्ट होताच चार शब्दात धनश्रीने घटस्फोटाचं कारण सांगितलं.
धनश्री आणि युझवेंद्र चहलचा घटस्फोट होऊन एक महिनाही उलटला नव्हता की त्याच्या नव्या नात्याची चर्चा सुरू झाली. दुबईमध्ये आरजे मैहवशसोबत दिसल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. याआधी देखील दोघांना मुंबई एका पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.
युजवेंद्र आणि धनश्री
युजवेंद्र आणि धनश्री यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांचा घटस्फोट झालाय असं देखील सांगण्यात येत आहे. दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List