“त्याने गर्भपात करायला सांगितला,तोच माझ्या मुलाचा बाप; असा दावा करणारी ही ब्रिटिश सुंदरी कोण?
बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काहीना काही चर्चा ही होतच असते. तसेच सेलिब्रिटींच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे किस्से हे नेमही चर्चेत असतात. लग्नाबद्दल असो किंवा त्यांच्या अफेअर्सबद्दल असो त्याबद्दल बोललं जातचं. या लिस्टमध्ये असेही अनेक अभिनेते आहेत ज्यांनी बॉलिवूडसाठी एकापेक्षा एक हीट चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या चित्रपटांमुळे त्या अभिनेत्यांचे करोडो चाहते आहेत पण त्यांच्या काही खासगी आयुष्यातील घडामोडी या खरोखरच धक्कादायक असतात.
वैयक्तिक आयुष्यामुळे आमिर कायम चर्चेत
असाच एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याने बॉलिवूडस्टार आहे पण त्याचे लग्न, घटस्फोट आणि एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअर यांच्या चर्चा बऱ्याच होतात. त्या अभिनेत्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणतात. तुम्हाला लक्षात आलं असेलच तो अभिनेता कोणता आहे ते. आमिर खानच्या चित्रपटांबद्दल वेगळं सांगायला नको. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो कायम चर्चेत असतो. आमिर खानचे दोन लग्न झाली होती आणि दोन्ही पत्नींपासून त्याचा घटस्फोट झाला आहे. किरण रावशी लग्न झाल्यावर आमिर खानचं नाव ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखशी जोडलं जात होतं. त्यांच्या नात्याची चर्चा माध्यमांमध्ये बरीच चर्चेत आली. मात्र, याबद्दल आमिर खानने किंवा फातिमाने भाष्य केलं नाही.
ब्रिटिश पत्रकार तथा लेखिका जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिप
फातिमा सना शेखसोबतच्या रिलेशनशिपपूर्वी अनेक वर्षे आमिरच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्या काळात त्याचं लग्न त्याची पहिली पत्नी रीना दत्तासोबत झालं होतं. त्या काळात, अभिनेत्याचे नाव कोणत्याही मॉडेल किंवा अभिनेत्रीशी जोडले गेलं नाही तर एका परदेशी पत्रकाराशी जोडलं गेलं. त्या काळातील मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, रीना दत्तासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता, ब्रिटिश पत्रकार तथा लेखिका जेसिका हाइन्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता.
दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते
जेसिका आणि आमिरची पहिली भेट आमिरच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 2005 मध्ये, एका मासिकाने आमिर आणि ब्रिटिश महिला पत्रकाराच्या रिलेशनशिपबद्दल लिहिलं होतं. त्याबद्दल जेसिकानेही आमिर रिलेशनशिप कबूलही केलं होतं. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं.
आमिरने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिलेला
जेसिकाने त्यांचे रिलेशनशिप कबूल केल्यांनंतर हाइन्सने असाही दावा केला होता की, लंडनमध्ये आमिरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना ती प्रेग्नन्ट राहिली होती. जेव्हा तिला वाटलं की ती आई होणार आहे, तेव्हा तिने आमिरला हे सांगितलं. आमिर खानने जेसिकाला गर्भपात करण्याचा सल्ला दिला असल्याचंही तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. पण जेसिकाने तसं केलं नाही आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव आहे ‘जॉन’. आणि जेसिकाच्या मते, जॉन हा आमिर खानचाच मुलगा आहे. पण आमिर खानने मात्र यावर कधीही भाष्य केलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List