मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण घोटाळ्याची चौकशी करा, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरण घोटाळ्याची चौकशी करा, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिकेत वर्ष 2023 ते 2024 या काळातील काँक्रीट रस्त्यांच्या कामामध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. X वर एक पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. आपल्या X पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “आपल्या मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून जिथे तिथे रस्त्यांची कामं सुरु आहेत, रस्ते बंद आहेत, धूळीचं साम्राज्य आहे. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे सरसकट कॉक्रिटीकरणाच्या नावाखाली मुंबईकरांची तिजोरी रिकामी करण्याचा हा महाघोटाळा सुरु आहे. ज्यावर मी सातत्याने आवाज उठवत आलोय.”

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “आज पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घोट्याळ्याची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही, मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही.”

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “मी आपणास बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सन 2023-2024 या कालावधीत मुंबईतील सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणातील घोटाळ्याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. सन 2023-2024 या कालावधीतील सिमेंट रस्ता काँक्रीटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेवर अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी, दि. 21 मार्च रोजी सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आपणास माहीतच आहे की, मुंबईतील सर्व रस्ते एकतर खोदून ठेवलेले आहेत किंवा अर्धवट कामामुळे वाहतुकीची अडचण करून ठेवलेली आहे.”

पत्रात ते पुढे म्हणाले आहेत की, 2023-2024 या कालावधीत सुरू झालेल्या मुंबईतील या सर्व रस्त्यांच्या कामाची आणि त्यातील टेंडर प्रक्रियेमधील घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी इओडब्ल्यूतर्फे लवकरात लवकर चौकशी सुरू करून सदर प्रकरणात सहभागी असलेल्या कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व इतर दोषी व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, ही विनंती.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हत्ती आणि मुंग्यांनो परत या, भारतात भला विनोद करायचा तरी कसा?, कामरा आणि शिंदे वादावर हा कॉमेडियन व्यक्त झाला हत्ती आणि मुंग्यांनो परत या, भारतात भला विनोद करायचा तरी कसा?, कामरा आणि शिंदे वादावर हा कॉमेडियन व्यक्त झाला
कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात राजकीय शेरेबाजी आणि विडंबनात्मक गाणे केल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उप...
कुणाल कामरावरून राजकारण तापलं, ‘मातोश्री’वर भुंकायची सुपारी राणेंना कोणी दिली? अंधारेंचा थेट सवाल
‘एकीकडे कोरटकरला अभय तर दुसरीकडे…’, कुणाल कामरा प्रकरणात राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
मी घाबरले.. हृदयाचे ठोके वाढले.. त्याने एका रात्रीचे किती घेणार विचारले?; मराठमोळ्या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
सलमान खानच्या चित्रपटात रश्मिका मंदान्ना ‘भूत’ आहे? ‘सिकंदर’मधले हे फोटो पाहाच
Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदेंवर कमेंट करण्यासाठी पैसे मिळाले होते का?; कुणाल कामराने दिले उत्तर
‘काय सहन करावं लागलंय’; प्रतीक बब्बरच्या पत्नीचे सासरे राज बब्बरवर गंभीर आरोप