एक अविश्वसनीय आणि असाधारण प्रेमकथेचा प्रवास, ‘माझी प्रारतना’ चित्रपटाचा पहिले पोस्टर प्रदर्शित
प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेम कोणत्याही सीमा मानत नाही. वय, जात, रूप, किंवा स्वरुप याला प्रेमाची अडचण नसते. दोन हृदयांमधील सुंदर बंधन म्हणजे प्रेम आणि लवकरच एक अशक्यप्राय प्रेमकथा चित्रपट रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. “माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे. त्यांचा हा नवा मराठी चित्रपट, प्रेमाच्या कच्च्या आणि तीव्र भावनांना समोर आणणारा आहे. जो तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल.
संगीतप्रधान कथा
ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घडणारी ही संगीतप्रधान कथा आहे. जी प्रेम, विश्वासघात आणि जगण्याच्या जिद्दीचा अद्भुत प्रवास मांडते. ही प्रेमकथा इतकी ताकदीची आणि हृदयस्पर्शी आहे की वादळासारखी तुमच्यावर आदळेल. तुम्हाला स्तब्ध आणि भारावून टाकेल. जीवनात कितीही दुःख असली तरी प्रेम अंतिम सत्य असते. हा मन हेलावून टाकणारा प्रवास तुम्हाला दाखवेल की प्रेम हेच सर्वकाही जिंकण्याची खरी ताकद आहे.
९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित
“माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा” हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पद्माराज राजगोपाल नायर आणि अनुषा अडेप मुख्य भूमिका साकारत आहेत. तसेच मराठीतील अनेक दिग्गज कलाकार देखील यात झळकणार आहेत. एस आर एम फिल्म स्कूल प्रस्तुत, पद्माराज नायर फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पद्माराज राजगोपाल नायर यांनी केले आहे. तर संगीत विश्वजित सी टी यांनी दिले आहे. या चित्रपटाबद्दल अधिक माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. तरी लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे.
प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारे पोस्टर प्रदर्शित
या चित्रपटाचे पहिला पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्कंठेने उच्चांक गाठला आहे. माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेमकथा हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. हे पाहून नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. “माझी प्रारतना – अकल्पनीय प्रेम कथा” ९ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List