SSC बोर्ड बंद करणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार? CBSE कन्व्हर्जनवरून सुप्रिया सुळेंचा संताप

SSC बोर्ड बंद करणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार? CBSE कन्व्हर्जनवरून सुप्रिया सुळेंचा संताप

सीबीएसई पॅटर्नवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदास सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. एसएससी बोर्ड तुम्ही बंद करणार का? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार एसएससी बोर्डाचा? असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

सीबीएसई बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे, हे ऐकून धक्काच बसला. आणि ते पहिलीपासून टप्प्या-टप्प्याने करणार आहेत. देशात प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे. सीबीएसई, आयसीएसई आहे आणि महाराष्ट्रात तर आता इंटरनॅशनल बॅक्लोरिएट आयबीच्या शाळा आहेत. तुम्हाला परदेशी आयबीच्या शाळा चालतात, मग एसएससीची शाळा तुम्हाला चालत नाही? सीबीएसईमध्ये किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता हे सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात आहे का? मी स्वतः एसएससी बोर्डातून शिकले आहे. त्यामुळे पालकांना बोर्ड निवडण्याचं स्वातंत्र्य द्या. एसएससी बोर्डाच्या विरोधात हे का निर्णय घेताहेत? या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

सीबीएसई बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? राज्यात तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताहेत, तुमची सीबीएसईची तयारी आहे का? हा खूप तांत्रिक आणि गंभीर मुद्दा आहे. इतक्या सहज त्यांनी वक्तव्य केलं की ते धक्कादायक होतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठी भाषेचं काय होणार? तामिळनाडूत जे आंदोलन करायला लागले ते आता खरं व्हायला लागलं आहे. कदाचित मराठीसाठी आपल्यालाही करावं लागेल. कारण एसएससी बोर्ड हे तुम्ही बंद करणार का मग? महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गंभीर विषय आहे, हा हलक्यात घेता येणार नाही. आम्ही सरकारला असं करू देणार नाही, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात