रेल्वे प्रवाशाचे तिकिट सापडले नाही म्हणून भरपाई नाकारू शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

रेल्वे प्रवाशाचे तिकिट सापडले नाही म्हणून भरपाई नाकारू शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या लोकल ट्रेनच्या मार्गावर गर्दीमुळे प्रवासी पडण्याचे सत्र सुरुच आहे. यात प्रवाशांना प्राण गमवावा लागतो. अशा अपघातांच्या प्रकरणातील भरपाईच्या दाव्यांबाबत उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशाचे तिकिट सापडले नाही म्हणून त्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई नाकारू शकत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. याचवेळी तरुणाच्या कुटुंबियांना 8 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

खचाखच गर्दी असणार्या विरार लोकलमधून पडून तरुणाला प्राण गमवावा लागला होता. 12 वर्षांपूर्वी, 5 फेब्रुवारी 2013 रोजी वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकादरम्यान तरुण लोकलमधून खाली पडला होता. त्याने विरारवरुन लोकल पकडली होती व तो अंधेरीला कामाला चालला होता. त्याने लोकलच्या द्वितीय श्रेणी डब्याचा मासिक पास काढला होता. त्यामुळे तो रेल्वेचा वैध प्रवासी होता. त्याच आधारे कुटुंबियांनी रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाकडे भरपाईचा दावा केला होता. तथापि, अपघातावेळी तरुणाजवळ लोकल ट्रेनच्या प्रवासाचे तिकीट वा मासिक पास सापडला नव्हता. त्या कारणावरून तरुण रेल्वेचा वैध प्रवासी मानण्यास न्यायाधिकरणाने नकार दिला होता आणि कुटुंबियांचा दावा फेटाळला होता.

रेल्वे अपघात दावे न्यायाधिकरणाने 16 मार्च 2020 रोजी दिलेल्या निकालाला तरुणाचे वडिल अनंत सुर्वे, आई अश्विनी सुर्वे आणि बहिण सिद्धी सुर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांच्या अपिलावर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने निकाल दिला.

प्रवाशाचा रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यू झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे आहेत. तथापि, केवळ मृत तरुणाच्या प्रवासाचे तिकीट वा पास सापडला नाही म्हणून कुटुंबियांना भरपाई नाकारता येणार नाही, असा निर्वाळा देत न्यायालयाने अपिलकर्त्या कुटुंबियांना 8 लाख रुपये भरपाई मंजूर केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कर्नाटकात मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळला, दोघांचा मृत्यू; अनेक जण जखमी कर्नाटकात मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळला, दोघांचा मृत्यू; अनेक जण जखमी
कर्नाटकच्या अनेकल येथे मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण...
IPL-2025 -CSK vs MI Toss – चेन्नई संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
SRH Vs RR – सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी! राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी केला पराभव, इशान किशनचे स्फोटक शतक
अँटिग्वातून फरार झालेला मेहूल चोक्सी बेल्जियममध्ये; बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतला आश्रय
Ratnagiri News – युवासेनेच्या वतीने 29 मार्च रोजी सीईटी सराव परीक्षेचे आयोजन
बेरोजगारीची कुऱ्हाड; अमेरिकी कंपनी बोइंगमधून 180 कर्मचाऱ्यांना काढले
Ratnagiri News – कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाबेटचे मानांकन मिळणारी माने इंटरनॅशनल स्कूल पहिली शाळा