IPL 2025, KKR vs RCB – रोमहर्षक सामन्यात RCB चा विजय; 7 गडी राखत KKR वर केली मात

IPL 2025, KKR vs RCB – रोमहर्षक सामन्यात RCB चा विजय; 7 गडी राखत KKR वर केली मात

IPL 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात झाला. हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर रंगला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने 8 गडी बाद 174 धावा केल्या. कोलकाता संघाने आरसीबीला विजयासाठी 175 धावांचे लक्ष्य दिले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने धडाकेबाज कामगिरी करत 13.2 षटकांत 2 गडी गमावून 134 धावा करत विजयाच्या दिशेने कूच केले आहे. या सामन्यात RCB ने 7 गडी राखत KKR वर मात केली आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी मिळून केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी 51 चेंडूत 95 धावांची भागीदारी झाली. सॉल्टने फक्त 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 56 धावा काढल्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर सॉल्टला स्पेन्सर जॉन्सनने झेलबाद केले. साल्टने 31 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार आणि दोन षटकार त्याने ठोकले. आरसीबीकडून विराट कोहलीने नाबाद 59 धावा केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्याचे नेतृत्व सेरेना म्हसकर, आर्यन पवारकडे, 34वी किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा राज्याचे नेतृत्व सेरेना म्हसकर, आर्यन पवारकडे, 34वी किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
येत्या 27 ते 30 मार्चदरम्यान होणाऱया 34 व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व मुंबई...
हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्यासह 19 पॅलेस्टिनी ठार
मीरा-भाईंदर युवासेना चषकावर एनपी स्पोर्ट्सची मोहोर
अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत गुजरात विजेता
कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं मिंधे गटाला झोंबलं, सेटची केली तोडफोड
कुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड, शिवसैनिकांचा अंधेरीच्या हॉटेलात राडा
एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असे गाणे, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले ‘कुनाल की कमाल’, आता शिवसेना कॉमेडियनविरोधात आक्रमक