मंत्री माणिकराव कोकाटे, भाजप आमदारांसह सर्वपक्षीय 25 माजी संचालकांना नोटिसा, जिल्हा बँकेच्या कर्जवाटपातील अनियमितता
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 347 कोटींच्या कर्जवाटपात 182 कोटींची अनियमितता केल्याप्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे, भाजप आमदार राहुल ढिकले, राहुल आहेर, अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह सर्वपक्षीय 25 माजी संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सहकार मंत्र्यांसमोर 2 एप्रिलला याची सुनावणी होणार आहे.
नाशिक, निफाड आणि आर्मस्ट्राँग साखर कारखाना, रेणुका औद्योगिक संस्था, म्हेळुस्के सहकारी सोसायटी आदी संस्थांना कर्जवाटप करताना अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी ही चौकशी केली आहे. 25 माजी संचालक आणि 15 अधिकारी-कर्मचाऱयांवर 182 कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. सहकार मंत्र्यांनी वसुलीच्या कारवाईला स्थगिती दिली होती. आता अपील अर्जावर सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List