चोरट्याने महिला डॉक्टरचे घर फोडले
मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या घरी चोरटय़ाने हातसफाई करत 47 लाखांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी दिंडोशी पोलीस तपास करत आहेत. या महिला डॉक्टर गोरेगावमध्ये राहतात. सासूने त्यांच्याकडे काही दागिने ठेवण्यास दिले होते. 18 मार्चला त्या घरी झोपल्या होत्या. सकाळी त्यांना जाग आली. त्यानंतर बंगल्यामागील दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला आढळला आणि दरवाजा सताड उघडा होता. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त पडले होते. कपाटात ठेवलेले 47 लाखांचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरटय़ाचा शोध घेत आहेत. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List