वेरवली येथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; कोकण रेल्वेच्या गाड्यांना विलंब
कोकण रेल्वे मार्गावर वेरवली येथे ओव्हरहेड वायरला सहाय्यक वायर तुटल्याने शनिवारी दुपारी कोकण रेल्वेची वाहतूक अडीच तासांसाठी खोळंबली होती. त्यामुळे काही गाड्या अडीच ते तीन तास उशिराने धावत होत्या.
वेरवली जवळ ओव्हरहेड वायरमध्ये हा बिघाड झाला. त्यामुळे रत्नागिरी ते वेरवली दरम्यानची कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. मात्र ओव्हरहेडमध्ये झालेल्या बिघाडाची दुरुस्ती होऊन वाहतूक पुर्ववत होईपर्यंत त्याचा फटका अन्य गाड्यांनाही बसला. त्यामुळे तेजस एक्सप्रेस,वंदे भारत एक्सप्रेस,जनशताब्दी एक्सप्रेस,मांडवी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस,मडगाव-एलटीटी एक्सप्रेस,केरळ संपर्कक्रांती एक्सप्रेस या गाड्या विलंबाने धावत होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List