यवतमाळ-अमरावती मार्गावर धावत्या शिवशाही बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित

यवतमाळ-अमरावती मार्गावर धावत्या शिवशाही बसला आग, सर्व प्रवासी सुरक्षित

यवतमाळ-अमरावती मार्गावर राज्य परिवहन विभागाच्या धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. चोर माऊली गावाजवळ बसने अचानक पेट घेतला. बसमध्ये आग लागताच चालक, कंडक्टर आणि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पळ काढला. यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही. आगीत बस जळून खाक झाली.

शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्न करत बसला लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत आगीमुळे शिवशाही बस राख झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला शेलारांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले ज्यांना निवडून येता येत नाही ते… राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला शेलारांचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले ज्यांना निवडून येता येत नाही ते…
मोठी बातमी समोर येत आहे. मनसेच्या पदाधिकारी बैठकीत बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यांनी यावेळी जोरदार हल्लाबोल...
लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, 2100 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी दिली मोठी अपडेट
शिवनेरी चालवताना मोबाईलवर मॅच पाहणाऱ्या चालकाची नोकरी गेली, आता टॅक्सी-रिक्षाचालकही रडारवर
प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लून्सर अन् अभिनेत्रीला जिवंत जाळण्याची धमकी
‘असे अश्लील कपडे कोण घालून येतं?…’, आयपीएलच्या उद्घाटन समारंभासाठी आलेली दिशा पटानी ड्रेसवरून ट्रोल
आर्चरचा नेम चुकला, हैदराबादने तुडवला; आयपीएल इतिहासात 4 षटकांमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला
बस चालवताना मोबाईलवर मॅच पाहणं महागात पडलं, शिवनेरी बस चालकावर कारवाई