प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट मागवा, पत्नीला समन्स पाठवा; इंद्रजित सावंत यांची मागणी

प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट मागवा, पत्नीला समन्स पाठवा; इंद्रजित सावंत यांची मागणी

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही उच्च न्यायालयात धाव घेणारा नागपूरचा शिवशंभूद्रोही आणि मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चिल्लर असलेला तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा गेल्या बावीस दिवसांपासून फरार आहे. आतातर इंदूर,चंद्रपूर नंतर थेट कोलकता मार्गे कोरटकर दुबईला पळून गेल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर आल्याने,गृहखात्याच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलीस स्टेशनला आणून दाखविणे आणि पासपोर्ट जमा करण्याबाबत त्यांच्या पत्नीलाउपस्थित राहण्याचे समन्स पाठविण्याची मागणी तक्रारदार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्राद्वारे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांना केले आहे.

या पत्रात इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे की, मला फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक नीच वक्तव्य व जातीमध्ये द्वेष निर्माण करणारे संभाषण याबद्दल प्रशांत कोरटकर या तथाकथित पत्रकाराविरोधात गुन्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनला नोंद झालेला आहे. पण आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे. आजपर्यंत प्रशांत कोरटकर हा इंदूर, चंद्रपूर, कोलकाता अशा ठिकाणी लपून बसल्याच्या बातम्या येत होत्या,पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर येत आहे. पोलिसांना फरार आरोपीची चौकशी करण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे कि, आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलीस स्टेशनला आणून दाखविणे आणि पासपोर्ट जमा करण्याबाबत त्याच्या पत्नीला उपस्थित राहण्याचे समन्स काढून पोलिसांनी त्यांची तपासात मदत घ्यावी. प्रशांत कोरटकरला लपण्यासाठी व नागपूरातून पळून जाण्यासाठी, दुबईला पलायन करण्यासाठी ज्यांनी मदत केली असेल तर त्यांची चौकशी करावी हे कायद्या च्या दृष्टीने आवश्यक असल्याचे या पत्रात म्हटले आहे.पत्रावर तक्रारकर्ता इंद्रजीत सावंत यांच्यासह त्यांचे वकिल ॲड. असीम सरोदे, ॲड. हेमा काटकर, ॲड. योगेश सावंत, ॲड. पल्लवी थोरात यांच्या सह्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात