सलमान खानसोबत ब्रेकअप, 2 मुलांचा बाप असलेल्या क्रिकेटरशी लग्न अन् घटस्फोट; ही अभिनेत्री कोण?
बॉलिवूड म्हटलं की अफेअर्स, घटस्फोट आणि नात्यांच चर्चा तर होतच असते. चित्रपटांपेक्षाही बॉलिवूडमधील या गोष्टींची चर्चा जरा जास्त प्रमाणात होताना दिसते. मग ती नाती आताची असो किंवा भूतकाळातील असो चर्चा मात्र सुरुच राहते. अशीच एक अभिनेत्री आहे जीच्या खासगी आयुष्याबद्दलची चर्चा आजही होते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आता चित्रपटांपासून तर दूर आहेच पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगांबद्दल आजही बोललं जातं.
सलमान खानची गर्लफ्रेंड
मुख्य म्हणजे ही अभिनेत्री सलमान खानची गर्लफ्रेंड राहिली आहे. सलमानसोबत या अभिनेत्रीचं लग्नही ठरलं होतं. मात्र काही कारणास्तव ते मोडलं. त्यानंतर ही अभिनेत्री त्याच्यापासून आणि चित्रपांपासूनही दूर झाली. मात्र त्यानंतरही तिच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. ही अभिनेत्री आहे संगीता बिजलानी.
2 मुलांचे वडिल असलेल्या क्रिकेटरसोबत लग्न
सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीता आणि एका क्रिकेटरचं नाव जोडलं गेलं. ते क्रिकेटर म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन. संगीता पहिल्याच नजरेत अझहर यांच्या प्रेमात पडली होती. मात्र तेव्हा मोहम्मद अझरुद्दीन विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंही होती. हे संगीतालाही माहित होतं.
मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी
मात्र असं असूनही, अझरुद्दीन देखील स्वतःला संगीता बिजलानीच्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकले नाही. 1985 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान मोहम्मद अझरुद्दीन यांची भेट बॉलिवूड अभिनेत्रीशी झाली आणि पहिल्याच नजरेत ते तिच्या प्रेमात पडले. मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांची प्रेमकहाणी 1990 च्या दशकात प्रसिद्ध झाली. त्यावेळी स्टायलिश फलंदाज अझरुद्दीन टीम इंडियाचे कर्णधार होते.
लग्नासाठी धर्म बदलला
संगीताशी लग्न करण्यासाठी मोहम्मद अझरुद्दीन 1996 पर्यंत ते वेगळे झाले. अझहर आणि नौरीनच्या 9 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट व्हायला संगीता बिजलानीच कुठेतरी जबाबदार होती. 1996 च्या इंग्लंड दौऱ्यावर संगीता अझहर यांच्यासोबत होती. त्यानंतर सर्वांनाच त्यांच्या या नात्याबद्दल समजलं. अझहर आणि संगीताचं लग्न गुपचूप पार पडलं. अझहरशी लग्न करण्यासाठी संगीताने धर्मही बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला होता.
लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट
लग्नाआधीच संगीता आयेशा बेगम झाली होती. मात्र, मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांचं नातंही फार काळ टिकलं नाही. 14 वर्षांच्या लग्नानंतर, 2010 मध्ये ते दोघेही वेगळे झाले. यानंतर अझहर यांचं नाव बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टाशी जोडलं जाऊ लागलं. पण यावर अझहर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List