शिवशाहीत युवतीचा विनयभंग; आरोपी अटकेत
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाहीत एका तरुणीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच शिवशाही बसमध्ये विनयभंगाची घटना समोर आली. पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱया एका तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना घडली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली. वैभव कांबळे (34) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मध्यरात्री बस सांगली स्टॅण्डवर आल्यावर तरुणीने दंगा केल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयितास पकडले. चोपत त्याला पोलीस ठाण्यात आणले. या वेळी डायल 112 आणि गस्ती पथक तत्काळ दाखल झाले होते. पीडितेने याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List