नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
हिंदुस्थानी नौदलात अग्निवीर पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी येत्या 29 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. नौदलाकडून 2026 बॅचसाठी एमआर (मॅट्रिक रिक्रूट) आणि एसएसआर (वरिष्ठ माध्यमिक रिक्रूट) पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अग्निवीर एसएसआर या पदासाठी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर अग्निवीर एमआर (शेफ, स्टीवर्ड, हायजिनिस्ट) या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर एसएसआरपदी निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षणाच्या सुरुवातीला 14,600 रुपये स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दरमहा 21,700 ते 69,100 रुपये दिले जातील, तर पदोन्नतीनंतर दरमहा 47,600 ते 1,51,100 रुपये दिले जातील. अग्निवीर एमआर निवड झालेल्या उमेदवाराला पहिले वर्ष दरमहा 30,000 रुपये, दुसरे वर्ष दरमहा 33,000 रुपये, तिसरे वर्ष दरमहा 36,500 रुपये, चौथे वर्ष दरमहा 40,000 रुपये दिले जातील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List