पुण्यात चाललंय काय, भररस्त्यात बीएमडब्ल्यू थांबवून तरुणाची लघुशंका; बड्या बापाच्या पोराला अटक

पुण्यात चाललंय काय, भररस्त्यात बीएमडब्ल्यू थांबवून तरुणाची लघुशंका; बड्या बापाच्या पोराला अटक

स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणामुळे हादरलेल्या पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे चाललेय काय, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच, आता येरवडा परिसरात संतापजनक घटना घडली आहे. बडय़ा बापाच्या मद्यधुंद पोराने आलिशान बीएमडब्ल्यू कार भररस्त्यात शास्त्री नगर चौकात थांबवली आणि सिग्नलजवळ लघुशंका केली. या वेळी काही लोकांनी त्याला हटकले असता, पँट खाली करून त्याने अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगाने निघून गेला. या वेळी कारमध्ये त्याचा मित्र बिअरची बाटली घेऊन बसला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, हा तरुण फरार झाला असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाच्या पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

गौरव मनोज अहुजा असे फरार आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र भाग्वेश ओसवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास येरवड्यातील शास्त्री नगर चौकात ही घटना घडली. दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध बीएमडब्ल्यू (क्रमांक – एमएच 12-आरएफ-8419) उभी करून थांबले. गौरव हा कारमधून खाली उतरला. त्याने रस्त्यावरच सिग्नलजवळ लघुशंका केली. येथे थांबलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये टिपला. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर नागरिकांची गर्दी होती. आजूबाजूच्या लोकांनी गौरव अहुजाला जाब विचारला असता, ते फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने निघून गेले. जाताना त्याने अश्लील चाळे केले. काही क्षणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर खडबडून जागे झालेल्या येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपी मिळू शकला नाही. दरम्यान, गौरव याच्यावर यापूर्वी बेटिंगच्या प्रकरणात कारवाई झाल्याची माहिती आहे.

मुलाने सिग्नलवर नव्हे, तर माझ्या तोंडावर लघुशंका केली

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तरुणाचे वडील मनोज अहुजा यांनी प्रतिक्रिया देत या कृत्याची लाज वाटत असल्याचे सांगितले. त्याने सिग्नलवर नाही, तर माझ्या तोंडावर लघुशंका केल्याचे त्यांनी उद्विग्नतेतून म्हटले. गाडीच्या नंबरवरून मनोज अहुजा यांना शास्त्री नगर पोलीस चौकीत आणले. या वेळी मनोज यांनी पोलीस जी काही कारवाई माझ्यावर करतील, ती मला मान्य असल्याचे सांगितले. अहुजा यांचा रेस्टॉरंट आणि बारचा व्यवसाय असल्याची माहिती आहे.

सकाळचा माज रात्री उतरला…

गौरव अहुजाचा माज रात्री उतरला. त्याने रात्री उशीरा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या, माफ करा असं तो यामध्ये म्हणत आहे. घटनेनंतर गौरव हा फरार झालेला आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी त्याने व्हिडिओ व्हायरल करून माफी मागितली. तसेच, पुढच्या आठ तासात येरवडा पोलीस ठाण्यात हजार होणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याने नक्की कुठून व्हिडिओ व्हायरल केला हे समजू शकले नाही. दरम्यान, गौरव रात्रभर कोरेगाव पार्क मुंढवा रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी करीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात