हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 

हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 

आरोपीने केलेले हे कृत्य लाज आणणारे आहे. त्याचा निषेध करायला हवा. अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे सांगत हायकोर्टाने आरोपीला दोन लाखांचा दंड ठोठावला. हे पैसे रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. यातील 50 हजार रुपये एका अनाथालयाला दान करण्यास सांगितले.

कोर्टातील व्हर्च्युअल सुनावणीला उपस्थित राहणारा एक आरोपी थेट शौचालयातून हजर राहिला. तसेच तो बेडरूममधून उपस्थित राहिला. अशा ठिकाणांहून उपस्थित राहिल्याने गुजरात उच्च न्यायालयाने या आरोपीला मोठा दंड ठोठावत त्याची चांगलीच कानउघडणी केली. हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही, अशा शब्दांत कोर्टाने आरोपीला खडसावले. कोर्टरूमच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगून कोर्टाने या आरोपीची चांगलीच कानउघाडणी केली.

गुजरात उच्च न्यायालयाने शौचालयातून सुनावणीला उपस्थित राहणाऱ्या आरोपीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला तसेच समाजसेवा करण्याची शिक्षा सुनावली, तर बेडरूममध्ये पलंगावर पडून सुनावणीला उपस्थित राहिल्याने त्याला कोर्टाने दंड ठोठावला. यातील  आरोपीचे नाव धवल पटेल आहे. जो सुनावणीवेळी न्यायाधीश एमके ठक्कर यांच्या कोर्टासमोर ऑनलाइन व्हिडीओ लिंकद्वारे उपस्थित राहिला, परंतु तो आक्षेपार्ह अवस्थेत असल्याने त्याला सहभागी करून घेतले नाही. त्याला पुन्हा सहभागी करून घेतले तेव्हा तो शौचालयात होता. यावर कोर्टाने पुन्हा त्याची व्हिडीओ लिंक डिसकनेक्ट केली. त्याने केलेले हे कृत्य लाज आणणारे आहे. त्याचा निषेध करायला हवा असे सांगत कोर्टाने म्हटले की, अशा व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी. हायकोर्टाने त्याला दोन लाखांचा दंड ठोठावला. हे पैसे रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. यातील 50 हजार रुपये एका अनाथालयाला दान करण्यास सांगितले.

कोर्टाने पटेलला दोन आठवडय़ांपर्यंत हायकोर्ट परिसरातील गार्डनची स्वच्छता आणि झाडांना पाणी देण्याची शिक्षा दिली. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, न्याय आणि व्यापक जनहित लक्षात ठेवून ऑनलाइन सुविधा देण्यात आली होती, परंतु ऑनलाइन लिंकने जोडलेल्या व्यक्तीने कोर्टाची मानमर्यादा ठेवायला हवा. याचिकाकर्ता बेडरूममध्ये झोपलेला होता. कोर्टातील सुनावणी अशी पाहत होता. जणू काही तो सिनेमागृहात चित्रपट पाहत आहे. कोर्टाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे कोर्टाने म्हटले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हणणारा कुणाल कामरा किती कोटीचा मालक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हणणारा कुणाल कामरा किती कोटीचा मालक?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ माजली आहे. कुणालने स्टँडअप कॉमेडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं असून...
कुणाल कामराच्या व्हिडीओवरून वाद; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, कोणाला सुनावलं?
ज्या स्टुडिओत रेकॉर्ड झाला कुणाल कामरा याचा शो, तेथे चालला हातोडा, पालिकेने केली ताबडतोब कारवाई
खरे ‘तारक मेहता’ कोण होते माहितीये का? निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांचं शरीर..
प्रतीक बब्बरने हटवलं वडिलांचं आडनाव; राज बब्बर यांच्याविषयी स्पष्ट म्हणाला “मला त्यांच्यासारखं..”
सैफ अली खान नाही तर, ‘या’ दिग्गज नेत्यावर फिदा होती करीना, लपून करायची असं काम
‘मिल्की ब्युटी’ म्हणणाऱ्या पत्रकारावर भडकली तमन्ना भाटिया; म्हणाली “महिलांचा आदर..”