आधी नवाजुद्दीनसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलाकारांना समन्स पाठवा; राखी सावंतने व्यक्त केला संताप
गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याचे दिसत आहे. या शोचे सूत्रसंचालक समय रैना आणि रणवीर अलाहबादिया यांच्या विरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आल्या. तसेच शोमध्ये हजेरी लावलेल्या पाहुण्या कलाकारांना देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले. त्यामध्ये अभिनेत्री राखी सावंतचा देखील समावेश आहे. आता राखीने या समन्सला उत्तर देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी ‘मी भिकारी आहे, माझ्याकडे एक रुपयाही नाही’ असे बोलताना दिसत आहे.
काय आहे राखीचा व्हिडीओ?
राखी सावंतने व्हिडीओ शेअर करत, ‘समन्स पाठवण्यात काही अर्थ नाही मित्रांनो… बरोबर ना? तुम्ही मला व्हिडीओ कॉल करा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. कारण मी एक कलाकार आहे. पैसे देऊन मला बोलावण्यात आले आणि मी गेले होते. बस… मी कोणाला शिवीगाळही केली नाही. त्यामुळे मला समन्स पाठवण्यात काही अर्थ नाही. आधी ५-५, १०-१० वर्षांच्या, ९०-९० वर्षांच्या महिलांच्या प्रलंबित बलात्काराच्या केसेस सोडवा’ असे म्हटले आहे.
समन्स विषयी पुढे बोलताना राखी सावंत म्हणाली, ‘मी भिकारी आहे, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे एक रुपयाही नाही. नाहीत माझ्याकडे काही. एक रुपयाही नाही. मी खरं सांगत आहे. मी दुबईत राहते. माझा काही व्यवसायही नाही. मी एक फुकरी आहे. तुम्हाला सांगते, मी पैसेही देऊ शकत नाही. मला फोन करून काय करणार? काही अर्थ नाही. रोज मुलींवर बलात्कार होत आहेत मित्रा, त्या मुलींची आणि त्यांच्या पालकांची कीव येते. त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा द्या. कृपया मी सर्वांना विनंती करते की त्यांना शिक्षा द्या. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही.आम्ही व्हाईट कॉलर आहोत.’
व्हिडीओमध्ये राखी पुढे म्हणाली, ‘मला कोणतेही पत्र मिळालेले नाही. मी गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून दुबईत राहते. मी भारतात राहत नाही. त्यामुळे ज्यांनी मला समन्स पाठवले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, नवाजुद्दीनसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्व सेलिब्रिटींना आधी समन्स पाठवावे. अश्लीलतेच्या नावाखाली मनोरंजन करणाऱ्या निर्मात्यांना आधी समन्स पाठवा.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List