यूएईमध्ये दोन हिंदुस्थानी नागरिकांना फाशी
संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये दोन हिंदुस्थानी नागरिकांना फाशी देण्यात आली आहे. हिंदुस्थान परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. फाशी दिलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना फाशीची माहिती दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. फाशी झालेले दोन्ही व्यक्ती हे केरळचे रहिवाशी होते. मोहम्मद रिनाश अरंगीलोट्टू आणि मुरलीधरन पेरुमथट्टा वलाप्पिल अशी त्यांची नावे आहेत. हे दोघे हत्येच्या आरोपात दोषी ठरले होते. त्यानंतर फाशीची शिक्षा सुनावली. संयुक्त अरब अमिरातच्या सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने या दोघांना फाशी देण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List