‘हिंदुस्थानात माझा छळ करतील’, प्रत्यार्पणाविरोधात तहव्वूर राणाची अमेरिकेच्या न्यायालयात धाव

‘हिंदुस्थानात माझा छळ करतील’, प्रत्यार्पणाविरोधात तहव्वूर राणाची अमेरिकेच्या न्यायालयात धाव

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यापारी आणि दहशतवादी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात हिंदुस्थानात प्रत्यार्पणाविरोधात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने हिंदुस्थानात पाठवल्यास माझा छळ केला जाईल, असं त्याने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. अद्याप त्याच्या याचिकेवर न्यायालयाने कोणताही निर्णय सुनावलेला नाही. जर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली तर त्याला हिंदुथानात पाठवले जाईल.

काय आहेत राणावर आरोप?

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाने हल्ल्यातील आणखी एक मास्टरमाइंड डेविड कोलमन हेडलीला मदत केली होती. या हल्ल्यासाठी राणाने मुंबईतील ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे.  मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर तहव्वूर राणा याला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’, मला सर्व समाजाचं नेतृत्व करायचंय, पंकजा मुंडे यांचे वक्तव्याची राज्यभर चर्चा
‘एक छंद मकरंद’ या गीताने अनेकांच्या दिवसांची सुरुवात होते. हे गीत आताच आठवण्याचे कारणही तसेच आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी...
Aurangzeb Tomb : औरंगजेबाचे थडगे सरकार पाडणार? मुख्यमंत्री म्हणाले घाईने….
मुंबईकरांनो, मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक… लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
गोविंदा शेर तर पत्नी सुनीता होणार सव्वाशेर; लवकरच एका गोष्टीची घोषणा
बॉलिवूडचा ‘फ्लॉप’ हिरो, बायकोच्याच बेस्टफ्रेंडसोबत केलं लग्न, 129 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याला ओळखलं का?
बनावट ‘शेरखान अॅप’च्या माध्यमातून घातला 71 लाखांचा गंडा
आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले