‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”

‘छावा’मधून डिलिट केलेला लेझीम डान्स व्हायरल; नेटकरी म्हणाले “आमचं दुर्दैव..”

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट म्हटल्यास त्यावरून वाद होणं हे जणू समीकरणच बनलं आहे. याला विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’सुद्धा अपवाद ठरला नाही. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील एका सीनवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा लेझीम नृत्याचा हा सीन होता. अखेर वादानंतर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सल्ल्यानंतर दिग्दर्शकांनी तो सीन चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लेझीमचा हा सीन चित्रपटात तसाच ठेवावा, अशीही भावना असंख्य नेटकऱ्यांची होती. अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या तीन आठवड्यांनंतर कोरिओग्राफरने लेझीम डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर विकी कौशलसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कोरिओग्राफर विजय गांगुलीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. लेझीम डान्सच्या रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे. ‘प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडण्यासाठी आम्ही सर्वजण अथक परिश्रम करतो. आमचे काही प्रयत्न अंतिम टप्प्यात पोहोचत नसले तरी आम्ही नेहमीच चित्रपटासाठी जे सर्वोत्तम आहे ते करतो. जगाला ते पाहता आलं नाही, तरी ते नेहमीच असंच राहील, ज्याचा मला अभिमान आहे. अशाच एका रिहर्सलचा हा व्हिडीओ आहे,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. या व्हिडीओवर विकीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘लेझीम ऑन’ असं त्याने लिहिलंय. तर ‘विकी कौशलसह हा व्हिडीओ अपलोड करा’, अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे. ‘हा सीन चित्रपटात पाहू शकलो नाही, हे आमचं दुर्दैव’, अशाही प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Ganguly (@vijayganguly)

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेला होता. तिथे माध्यमांशी बोलताना त्याला चित्रपटातील लेझीमच्या सीनवरून वाद निर्माण झाला, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “शिवगर्जनेशिवाय आम्ही शूटिंगची सुरुवात केली असेल, असा एकही दिवस नव्हता. चित्रपटात महाराजांच्या लेझीमचा प्रसंग फक्त वीस ते तीस सेकंदांचा होता. तो कथेचा भाग नव्हता. पण महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचावी म्हणून तो सीन त्यात समाविष्ट करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यामुळे जर एखाद्याने त्यांना त्यांच्यासोबत लेझीम खेळण्याची विनंती केली असेल तर राजेंनी ते नक्कीच ऐकलं असेल. पण जर शिवप्रेमींना त्या सीनबद्दल आक्षेप असेल तर आम्ही तो सीन वगळणार असल्याचं जाहीर केलंय. तो सीन चित्रपटातील महत्त्वपूर्ण भाग नाहीये.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवाची काठी लागत नाही, न्याय मात्र मिळतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, त्या खंडणी प्रकरणाविषयी मोठी मागणी देवाची काठी लागत नाही, न्याय मात्र मिळतो, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया, त्या खंडणी प्रकरणाविषयी मोठी मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येची फोटो आणि व्हिडिओ समोर आली आहेत. त्यानंतर राज्यात लोकांच्या संतापाचा उद्रेक दिसत आहे....
Aditya thackrey : सरकार बरखास्त केलं पाहिजे – आदित्य ठाकरे आक्रमक
या घडीची सर्वात मोठी बातमी! धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा, ‘पीए’ सागर बंगल्यावर
आर. माधवन तरुणींसोबत फ्लर्ट करतो? ‘तो’ स्क्रीनशॉट व्हायरल होताच म्हणाला…
‘छावा’नंतर संतोष जुवेकरची फॅनफॉलोइंग अन् क्रेझ वाढली, गोव्याच्या स्टारबक्समध्ये मिळालं खास सरप्राइज
‘ही ओव्हरस्मार्ट पिढी..’; समय रैनाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच फटकारलं
रमजान सुरु होतात विकी कौशलचं मोठं वक्तव्य चर्चेत, ‘छावा सिनेमाच्या सेटवर रोझा…’