मराठेकालीन साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसेनेचा उपक्रम
‘जय भवानी, जय शिवाजी… हर हर महादेव.. जय श्रीराम’च्या जयघोषात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात आज मंगळवारी मराठेकालीन साहसी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके करण्यात आली. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुख्य संयोजकतेखाली हा सोहळा पार पडला.
तोफेच्याद्वारे गोळाबार उडवून आणि नारळ फोडून या मराठेकालीन साहसी खेळास सुरुवात करण्यात आली. नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचे प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली. शिवकालीन मर्दानी खेळ असे या सादर केलेल्या प्रात्यक्षिकांची नावे होत. यामध्ये ढाल तलवार, लाठीकाठी, दांडपट्टा, विटा, खंजीर, कुऱ्हाड, बरची व भाला या साहसी खेळांचा समावेश होता. प्रात्यक्षिके दाखवणारी सर्व मुले आणि मुली ८ वर्षावरील होती. ८ मुले व ९ मुली असा हा संघ असल्याचे सुहास सातापे यांनी सांगितले. पारंपारिक आणि कोकणी संस्कृतीशी संबंधित ताशा, ढोल ताशा व टिमकी या वाद्यांच्या तालावर या प्रात्यक्षिकांचा आनंद प्रेक्षकांनी घेतला.
या मुलांनी दाखवले साहस
वंश हजारे, नेदांत पालशेतकर, शैकल्प पालशेतकर, यश पालशेतकर, तन्मय गायकर, विनीत टेमकर, सोहम गावडे, राज वाधे, सुहास सातोपे, विजय गोठणकर (वाजंत्री), ईश्वरी रामाणे, सिद्धी जाधव, प्राची
जाधव, रितीका जाधव, भैरवी जाधव, त्रिशा गोरीवले, निष्का शाळती, सचिदा पालशेतकर व दीपश्री देसाई या मुला-मुलींनी ह्या साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखवली. अंगावर शाहारे आणणारी ही प्रात्यक्षिके या मुलांनी सादर केली. दांडपट्टयाद्वारे पायाखालील लिंबू कापणे, दोन्ही बाजूने आगीचे गोळे लावून काठीही फिरवणे, अशा जोखमी साहसी खेळांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. शहरातील शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा ठरला. मोठ्या संख्येने शहरातील शिवप्रेमी व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हा साहसी खेळ
पाहण्यासाठी आले होते. गुरुवर्य मधुसूदन पाटील उर्फ बाळू तात्या यांचे शिष्य संस्थापक प्रशिक्षक संकेत सातोपे यांची ही संस्था होय.
विदेशी पाहुण्यांनी लुटला आनंद
मराठेकालीन आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील साहसी खेळांचा हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी काही विदेशी पाहुणेही आले होते. यामध्ये ब्राझील येथील अंडरसन मोरास्की, अमेरिका येथील लुसी व्हिटेकर, रायन सिम्पसन व इग्लंड येथील जॅक कॉर्नवाल यांचा समावेश होता.
■ अंबादास दानवे यांनी चालवली तलवार
शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिके पाहात असताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही. शिवसेनेचे उपशहरप्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजी केली. अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, विजय वाघमारे, संतोष खंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख जयसिंग होलीये, राजेंद्र दानवे, प्रमोद ठेंगडे, संजय हरणे, नंदू लबडे, रणजीत दाभाडे, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, विधानसभा संघटक रेणुका जोशी यांची उपस्थिती होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List